IPL 2019 : चेन्नई नाही 'हे' चार संघ पोहचू शकतात प्लेऑफमध्ये

सध्या चेन्नई गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर असली तरीही ते प्लेऑफमधून बाहेर पडू शकतात.

  • Share this:

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. त्यांनी 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई 10 सामन्यात 6 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.  आयपीएलच्या 12 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला 37 धावांनी पराभूत केलं होतं.

शुक्रवारी होत असलेला सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर होत असून इथं त्यांनी पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईला घरच्या मैदानावर पराभूत करणं मुंबईसमोर आव्हान असेल. घरच्या मैदानाव धोनीच्या संघाला पराभूत करणं कठिण आहे. 16 गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ चेन्नई मानले जात आहे. तरीही ते प्लेऑफमधून बाहेर पडू शकतात.

चेन्नईचे लीगमधील तीन सामने बाकी आहेत. यात त्यांचा सामना मुंबई, दिल्ली आणि पंजाब यांच्याशी होणार आहे. जर यात चेन्नईचा पराभव झाला तर त्यांचे गुण 16 एवढेच राहतील.

दिल्लीने 11 पैकी 7 सामने जिंकून 14 गुणांसह दुसऱे स्थान पटकावले आहे. उरलेल्या तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यास 20 गुणांसह ते अव्वल स्थान पटकावतील

दिल्लीनंतर मुंबईने 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांचे 4 सामने बाकी आहेत. यात चेन्नई वगळता इतर कोणत्याही संघाकडून पराभव झाला तरी 18 गुणांसह ते सीएसकेला मागे टाकतील.

हैदराबादच्या संघालाही प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता येऊ शकतं. त्यांनी 10 पैकी 5 सामने जिंकले असून 4 सामने बाकी आहेत. जर ते राजस्थान, बेंगळुरू आणि मुंबईविरुद्ध जिंकले आणि पंजाबविरुद्ध पराभूत झाले तरी 16 गुण मिळवून चेन्नईला मागे टाकू शकतात.

किंग्ज इलेव्हन पंजाबने यंदाच्या आयपीएलमध्ये 5 सामने जिंकून 10 गुण मिळवले आहेत. त्यांचे तीन सामने बाकी आहेत. अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला शिल्लक राहिलेल्या सर्व सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. तरच ते चेन्नईला मागे टाकून प्ले ऑफमध्ये स्थान पटकावू शकतात.

मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि पंजाब या संघांची कामगिरी चांगली राहिली तर चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचणं कठिण होऊ शकतं. यामध्ये इतर संघांची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे अशक्य असलं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यात काहीही होऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:29 AM IST

ताज्या बातम्या