IPL 2019 : शाहरुखचा विकेण्ड विराटच्या हाती, 240 चेंडूत ठरणार KKRचं भवितव्य

IPL 2019 : शाहरुखचा विकेण्ड विराटच्या हाती, 240 चेंडूत ठरणार KKRचं भवितव्य

एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या शाहरुखच्या कोलकाता संघाला आता प्ले ऑफ गाठण्यासाठी इतर संघांवर अवलंबुन रहावे लागत आहे.

  • Share this:

बंगळुरू, 04 मे : आयपीएलचा बारावा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. त्यामुळं सध्या कोणते चार संघ प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करतोय याकडे सर्वांच्या नजरा आहे. यात दिल्ली, चेन्नई आणि मुंबई या तीन संघानी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं आता केवळ एक स्थान बाकी आहे. त्यासाठी हैदराबाद आणि कोलकाता अशा दोन संघांमध्ये चुरस रंगली आहे.

दरम्यान शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सने आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकातानं 7 विकेटनं पंजाबवर विजय मिळवला. त्यामुळं 12 गुणांसह कोलकाता आता 5व्या स्थानावर आहे. त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी एक विजय तर हैदराबादचा पराभव गरजेचा आहे.

सध्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. मात्र त्यांचा रनरेट चांगला असल्यामुळं प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. तर, दुसरीकडं कोलकाताच्या संघाकडेही 12 गुण आहेत. मात्र त्यांचा रनरेट हैदराबादपेक्षा कमी असल्यामुळं त्याचा फटका त्यांना बसु शकतो.

पॉइंट टेबल


कोलकाताचं भवितव्य बंगळुरूच्या हाती

कोलकाता संघानं आयपीएलच्या सुरुवातीला आपला दबदबा निर्माण केला होता. सलग सामने जिंकत एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या शाहरुखच्या कोलकाता संघाला आता प्ले ऑफ गाठण्यासाठी इतर संघांवर अवलंबुन रहावे लागत आहे. त्यामुळं आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदावर होत असलेल्या बंगळुरू विरुद्ध हैदराबाद या सामन्यात जर बंगळुरूनं विजय मिळवला तर, कोलकाताचा संघ प्ले ऑफमध्ये आपली जागा निश्चित करु शकतो.


VIDEO : राहुल गांधींनी 'त्या' कंपनीसाठी अमिताभ बच्चनच्या भावाचा पत्ता दिला, जेटलींचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या