चेंडू स्वत:हून फिल्डरच्या हातात, शोएब अख्तरने शेअर केला VIDEO

चेंडू स्वत:हून फिल्डरच्या हातात, शोएब अख्तरने शेअर केला VIDEO

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : आयपीएलचा फिव्हर सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. सगळीकडे क्रिकेटमय वातावरण झालं आहे. क्रिकेटवेडे काय करतील सांगता येत नाही. याच फिव्हरमध्ये अनेक विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हायरल व्हिडिओ रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने शेअर केला आहे. यात काही मुले क्रिकेट खेळताना दिसत आहेत.यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सुरुवातीला पंजाबचा कर्णधार अश्विनने जोस बटलरची मंकडिंग पद्धतीने घेतलेली विकेट चर्चेत आली होती. त्यानंतर त्याच्यावर अनेकांनी अखिलाडूवृत्तीचा आरोप केला होता. तर काहींनी अश्विनने क्रिकेटच्या नियमाचा वापर केल्याचे म्हणत समर्थन केले होते. यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. यात मंकडिंगपासून वाचण्यासाठी जुगाड केल्याचेही व्हिडिओ होते.अश्विनच्या मंकडिंग प्रकरणानंतर पुढच्या सामन्यात पंचांच्या चुकीने बेंगळुरूला पराभव पत्करावा लागला होता. त्यावेली विराटने पंचांनी गल्ली क्रिकेट नाही तर आयपीएल असल्याने डोळे उघडे ठेवावे म्हणत संताप व्यक्त केला होता.गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात येऊन पंचांशी हुज्जत घातल्याने नवा वाद निर्माण झाला. त्याबद्दल धोनीला सामन्याच्या मानधनातील 50 टक्के रकमेचा दंडही करण्यात आला आहे. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी धोनीच्या या कृतीवर सडकून टीका केली आहे.

मोदींची 'मन की बात' हिटलरची काॅपी, राज ठाकरेंचं UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 11:36 AM IST

ताज्या बातम्या