चेन्नई, 02 मे : आयपीएलमध्ये आतापर्यंत जवळजवळ सर्वच हंगामात केवळ एकाच संघाच वर्चस्व राहिलं आहे. तो संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. या संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर ठेवण्यासाठी झटत असतो. चेपॉकवर सहा सामने जिंकत घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा चेन्नई हा एकमेव संघ ठरला आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात धोनीचा मोलाचा वाटा असला तरी, चेन्नईचा किंग मात्र दुसराच खेळाडू आहे.
दिल्ली विरोधात विश्रांतीनंतर पुन्हा मैदानावर दाखल झालेल्या धोनीची बॅट तळपली. त्यानं नाबाद 44 धावांची खेळी केली. पण चेन्नईच्या ताफात एक असा खेळाडू आहे, ज्यानं पहिल्या हंगामापासून मॅच विनिंग खेळी केली आहे. तो खेळाडू म्हणजे सुरेश रैना. रैनानं दिल्ली विरोधात 59 धावांची खेळी केली. त्यातच त्यानं आतापर्यंत सर्व हंगामात 300 धावा करण्याचा खास विक्रम केला आहे.
रैनाचा खास रेकॉर्ड
चेन्नई सुपरकिंग्जचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना यानं दिल्ली विरोधात आपलं 37वं अर्धशतक पुर्ण केलं. सर्वात जास्त अर्धशतक करण्याच्या यादीत रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, डेव्हिड वॉर्नर 44 अर्धशतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
विराट आणि रोहितच्या क्लबमध्ये शामिल झाला रैना
या अर्धशतकासह सरेश रैना सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शामिल झाला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे भारताचा कर्णधार विराट कोहली. सुरेश रैनानं 50वेळा 50 धावा केल्या आहेत. तर, विराट (60), रोहित (54), शिखर धवन आणि गौतम गंभीर (53) यांचा क्रमांक लागतो.
सुरेश रैना आयपीएलचा खरा किंग
आयपीएलच्या इतिहासात सर्व हंगामात सुरेश रैना आतापर्यंत 100 झेल घेतले आहेत. असा पराक्रम करणारा सुरेश रेैना एकमेव फलंदाज आहे. त्यानंतर 80 झेलसह एबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, रैनानं आयपीएलच्या सर्व हंगामात 300 धावा करण्याचा विक्रम कोणत्याही फलंदाजानं केलेला नाही. रैनानं 2013मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. या हंगामात त्यानं 548 धावा केल्या होत्या. तर, आयपीएलमध्ये 189 सामन्यात 5291 धावांसह सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर आहे.
प्रियांका गांधींना चावणार होता साप, पाहा हा VIDEO