VIDEO : नो बॉल 2.0, जडेजा आणि रायडू भडकले

VIDEO : नो बॉल 2.0, जडेजा आणि रायडू भडकले

पुन्हा एकदा शेवटच्या षटकात नो बॉल न दिल्याने तणाव निर्माण झाले होते.

  • Share this:

हैदराबाद, 17 एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात हैदराबादने 6 गडी राखून विजय मिळवला. पण या सामन्यात पुन्हा एकदा नो बॉलचा वाद बघायला मिळाला. चेन्नईचा संघ फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकात हे नाट्य घडलं. हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा बाउन्सर रविंद्र जडेजाच्या खांद्याच्या बराच उंचीवरून गेला. यावेळी पंचांनी एका बाउन्सरचा इशारा दिला. त्यावेळी नॉन स्ट्राइकला असलेल्या अंबाती रायडूने हा चेंडू नो बॉल असल्याचे पंचांना सांगितले.

पंचांनी अंबाती रायडूला समजावून सांगितले तोपर्यंत रविंद्र जडेजा पंचांच्या दिशेने पुढे आला. त्याने याआधीच एक बाउन्सर झाला असून आणखी एक बाउन्सर कसा काय दिला? हा नो बॉल द्यावा अशी मागणी त्याने केली.मात्र पंचांनी जडेजाची मागणी फेटाळून लावली. अंबाती रायडू आणि ज़डेजाच्या नो बॉलच्या मागणीमुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.

...तर पंत, रायडु आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

वॉर्नर आणि बेअरस्टोच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने चेन्नईवर 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नईने दिलेले 133 धावांचे आव्हान 16.5 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. धोनीच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या चेन्नईला यंदाच्या हंगामातील दुसरा पराभव पत्करावा लागला. डेव्हिड वॉर्नरने 25 चेंडूत 50 धावांची वेगवान खेळी केली. तो बाद झाला तेव्हा संघाच्या 6.4 षटकांत 1 बाद 66 धावा झाल्या होत्या. वॉर्नरला दीपक चहरने बाद केले. वॉर्नरनंतर आलेल्या केन विल्यम्सन (3 धावा) आणि विजय शंकर (7 धावा) यांना इम्रान ताहीरने बाद केले. यानंतर बेअरस्टोने 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दीपक हूडा संघाला अवघ्या 2 धावा हव्या असताना बाद झाला. शेवटी बेअरस्टोने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 44 चेंडूत 61 धावा केल्या. यंदाच्या हंगामातील हैदराबादचा हा चौथा विजय आहे.

नशेत गाडी चालवलेल्या क्रिकेटपटूच्या हाती वर्ल्ड कपचे नेतृत्व

यापूर्वी राजस्थान विरुद्धच्या सामन्यात खेळण्यात आलेल्या सामन्यात नो बॉल वरून वाद झाला होता. यावेळी चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी रागाने मैदानावर आला. इतकंच नाही तर त्याने पंचांशी हुज्जतही घातली होती. याप्रकरणी त्याचे सामन्यातील 50 टक्के मानधनही कापण्यात आले होते.

...तर बरं झालं असतं, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल, पाहा VIDEO

First published: April 17, 2019, 11:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading