News18 Lokmat

नवदीपला वर्ल्ड कपमधून पदार्पणाची संधी : आशिष नेहरा

नवदीप सैनीची अंतिम 15 मध्ये निवड झाली नसली तरी त्याला स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 08:39 AM IST

नवदीपला वर्ल्ड कपमधून पदार्पणाची संधी : आशिष नेहरा

नवी दिल्ली, 19 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर अनेकांनी वेगवेगळी मते नोंदवली. भारताने नवदीप सैनीला स्टँडबायवर आहे. आरसीबीचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराने नवदीप सैनी वर्ल्ड कपमधून पदार्पण करू शकतो असं म्हटले आहे.

आरसीबीने सैनीला तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. गेल्या हंगमात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, यंदा चांगली कामगिरी करत आहे.

हरियाणाचा असलेल्या सैनीला वर्ल्ड कपच्या 15 जणांमध्ये स्थान मिळालं नसलं तरी त्याची स्टँडबायसाठी निवड करण्यात आली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळवलं आहे.

वर्ल्डकपच्या संघात चेन्नईकडून खेळणारे धोनी, जडेजा आणि केदार जाधव तर मुंबई इंडियन्सचे रोहित, बुमराह आणि हार्दिक पांड्या हे तिघेजण आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळाणाऱे केएल राहुल, मोहम्मद शमी, केकेआरचे कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिक, आरसीबीचे विराट आणि युझवेंद्र चहल, हैदराबादचे भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर आणि दिल्लीचा शिखऱ धवन यांचा वर्ल्ड कपच्या संघात समावेश आहे.

VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 08:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...