रोहितचं नवं ट्रम्प कार्ड पदार्पणातच हिट, मुंबईचा दणदणीत विजय

रोहितचं नवं ट्रम्प कार्ड पदार्पणातच हिट, मुंबईचा दणदणीत विजय

अलझारी जोसेफने आयपीएलच्या पदार्पणातच 6 विकेट घेतल्या.

  • Share this:

हैदराबाद, 6 एप्रिल : प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला फक्त 136 धावाच करता आल्या. सनरायझर्स हैदराबादला 96 धावांत गुंडाळूव मुंबईने 40 धावांनी विजय मिळवला. पदार्पणाच्या सामन्यातच अलझारी जोसेफने हैदराबादचा धुव्वा उडवला. त्याने 6 विकेट घेत हैदराबादला गारद केले. मुंबईने दिलेल्या 137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावाची सुरुवात चांगली झाली. मात्र चौथ्या षटकात चहरने बेअरस्टोला बाद केले तर पाचव्या षटकात डेव्हिड वॉर्नर आणि सातव्या षटकात विजय शंकरला बाद करत अलझारी जोसेफने बाद केले. वॉर्नर 15 तर विजय शंकर 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेला बेहरेनडॉर्फने बाद केले. तर युसुफ पठाणला खातेही खोलता आले नाही. राहुल चहरने त्याला बाद केले. त्यानंतर सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांना बाद करून अलझारी जोसेफने मुंबईला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये सुरू असलेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत 7 बाद 136 धावा केल्या. कर्णधार भुवनेश्वर कुमारचा गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत फिरकीपटू मोहम्मद नबीने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. रोहित शर्माला 14 चेंडूत 11 धावाच करता आल्या. त्यानंतर सुर्यकुमार यादवला संदीप शर्माने बाद केलं. सुर्यकुमारने 8 चेंडूत 7 धावा केल्या. क्विटन डी कॉक 19 धावा काढून बाद झाला. त्याला एस कौलने बाद केले. त्यानंतर कृणाल पांड्या आणि इशान किशन लागोपाठ बाद झाले. कृणाल पांड्या 6 तर इशान किशन 17 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे संघाच्या 26 चेंडूत 46 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हार्दीक पांड्यालाही जास्त धावा करता आल्या नाहीत. त्याला 14 धावांवर राशिद खानने विजय शंकरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने राहुल चहरला बाद केले. शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीने मुंबईला 136 धावांवर पोहचवले.

'पार्थने केलेली चूक फासावर चढवण्याऐवढी गंभीर नाही'

First published: April 6, 2019, 11:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading