IPL 2019 : 'हे' आकडे वाढवत आहेत रोहित आणि धोनीचं टेंशन

IPL 2019 : 'हे' आकडे वाढवत आहेत रोहित आणि धोनीचं टेंशन

चेन्नई आणि मुंबई यांच्यात चेपॉकवर अटीतटीचा सामना होणार यात काही वाद नाही.

  • Share this:

चेन्नई, 07 मे : आयपीएलचा बारावा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. दरम्यान आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात चेपॉकवर पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान यात जो संघ सामना जिंकेल त्याला तो थेट अंतिम सामन्यात पोहचेल तर, हरणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळले. या सामन्यात रोहित आणि धोनी यांच्यावर कर्णधार म्हणून जास्त जबाबदारी असणार आहे. त्यामुळं या दोघांना संघ निवडीवर जास्त भर द्यावा लागणार आहे.

चेन्नई बनणार पुन्हा चॅम्पियन ?

सध्या गुणतालिकेत मुंबईचा संघ नंबर एकवर आहे तर, चेन्नईचा संघ दुसऱ्या नंबरवर आहे. जर आकड्याचं गणित पाहिलं तर, 2008नंतर गुणतालिकेत 6 वेळा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघानं नेहमीच बाजी मारली आहे. तर, पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघानं केवळ 2 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. तसेच, नंबर तीन आणि चार क्रमांकावर असलेल्या संघांनी केवळ एकदा आयपीएलचा किताब जिंकला आहे.

वाचा- IPL 2019 : कोण आहे 'ही' RCBची हॉट मिस्ट्री गर्ल ?

मुंबई vs चेन्नई

चेन्नई आणि मुंबई यांच्यात पहिला क्वालिफायर सामना आज होत असून, नॉक आऊट राऊंडचे आकडेही धोनीच्या बाजूने आहेत. 2010मध्ये अंतिम सामन्यात दोन्ही संघ भिडले होते. त्यावेळी चेन्नईनं मुंबईवर विजय मिळवला होता. 2012मध्यो दोन्ही संघ एलिमिनेटरमध्ये समोरासमोर आले होते, त्यावेळीही चेन्नई मुंबईवर भारी पडला होता. तर, 2013मध्ये दोन्ही संघ क्वालिफायरमध्ये एकमेकांसमोर आले होते, त्यावेळीही चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं होतं. पण 2013मध्ये अंतिम सामन्यात रोहित शर्मानं धोनीला हरवतचं पहिल्यांदा आयपीएलचा किताब जिंकला होता. तर, 2014च्या एलिमिनेटरमध्ये चेन्नईनं मुंबईचा पराभव केला होता. तर, पुढच्याच वर्षी 2015मध्ये मुंबईनं चेन्नईला पराभूत करत आपलं दुसरं विजेतेपद मिळवलं. त्यामुळं हे दोन संघात अटीतटीचा सामना होणार आहे.

वाचा- IPL 2019 : 'या' प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरणार रोहित आणि धोनीचा संघ ?

अटीतटीची लढत

चेन्नई आणि मुंबई हे दोन्ही संघ एकूण 6 वेळा नॉक आऊट सामन्यात एकमेकांसमोर आले आहेत. ज्यात 4 वेळा धोनीनं बाजी मारली आहे तर, 2 वेळा मुंबईनं. त्यामुळं आकडे पाहिल्यास चेन्नईचा संघ वरचढ आहे. पण आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले आहेत. पण दोन्ही वेळा मुंबईनं बाजी मारली आहे. त्यामुळं धोनी नक्कीच चिंतेत असेल.

वाचा- IPL 2019 : रोहितच्या 'या' हुकुमी एक्क्यानं धोनी देणार मुंबईला मात

VIDEO: सत्ता, समृद्धीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देवाकडे साकडे

First published: May 7, 2019, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading