मुंबई, 02 मे : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सध्या प्ले ऑफसाठी सर्व संघांमध्ये चुरस सुरु आहे. याआधी चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी प्ले ऑफमध्ये एण्ट्री केली आहे. त्यामुळं आता केवळ दोन जागांसाठी पाच संघांमध्ये लढत सुरु आहे.
आज मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यात वानखेडेवर सामना होत असून मुंबईनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यावर इतर संघांच्याही नजरा खिळल्या आहे. दरम्यान हा सामना मुंबई संघानं जिंकला तर, ते थेट प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. मुंबई सध्या 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आजचा सामना त्यांनी जिंकला तर ते दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतील.
तर, हैदराबादचा संघ हरला तर कोलकाताच्या संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची एक संधी मिळेल. तर, दिल्ली कॅपिटल्सलाही राजस्थान विरुद्धचा आपला शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. जर आज मुंबईनं सामना गमावला आणि त्यानंतर कोलकाता विरोधातही मुंबई हरली तर मुंबईच्या प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी हुकणार आहे. कोलकाताचा सध्याचा रनरेट 0.1 आहे. त्यांना मुंबईच्या पराभवाचा थेट फायदा होईल.
हैदराबाद संघाला आज विजय मिळाला तर तेही प्ले ऑफमध्ये आपल स्थान पक्कं करु शकतात. त्यामुळं अंतिम 4 मध्ये पोहचणाऱ्या संघांमध्ये आता मुंबई आणि हैदराबाद यांच्या अपेक्षा जास्त आहेत. मुंबई आणि हैदराबाद यांच्या सामन्यावर कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांच भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान बंगळुरू संघ याआधीच स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. मात्र आज तर हैदराबादच्या संघाला मुंबईकडून पराभव स्विकारावा लागला तर, राजस्थान रॉयल्सही आयपीएलमधून बाहेर होणार आहे. तर, बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला एक, तर हैदराबादला दोन विजयांची आवश्यकता आहे. दरम्यान वानखेडेवरील वर्चस्व यंदा मुंबईला राखता आलेले नाही. त्यांना यंदाच्या हंगामात पाचपैकी तीनच लढती जिंकता आलेल्या ओहत.
VIDEO : गडचिरोली स्फोटाबाबत गाफील राहिलात का? पोलीस महासंचालक म्हणतात...