मुंबई, 23 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपल्या पहिल्याच सामन्यात 6 विकेटसह विक्रम करणारा मुंबई इंडियन्स संघाचा अल्झारी जोसेफ याला दुखापतीमुळं मायदेशी परतावं लागलं. यामुळं मुंबई संघाची गोलंदाजी काहीशी कमकुवत झाली होती. मात्र, आता मुंबई संघाला त्याचा पर्याय सापडला आहे.
मुंबईच्या ताफ्याता आता दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा जलदगती गोलंदाज ब्युरन हेंड्रीक्स याचा समावेश होणार आहे. उर्वरित सामन्यांसाठी हेंड्रीक्स मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करेल. यामुळं रोहित शर्माला काहीसा दिलासा मिळणार आहे.
आयपीएलला सुरुवात होण्याआधीच न्यूझीलंडच्या अॅडम मिलनने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या जागेवर अल्झारी जोसेफची मुंबईच्या संघात निवड झाली होती. आपल्या पदार्पणाच्या हंगामातचं जोसेफने 6 विकेट घेत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. मात्र, त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळं तो माघारी परतला. आता त्याची जागा हेंड्रिक्स घेणारआहे. हेंड्रिक्स 2014च्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन संघाकडून खेळला होता. तर, त्यानं ऑस्ट्रेलिया संघाकडून 12 मार्च 2014 रोजी पहिला टी-20 सामना खेळला होता. 5 टी-20 सामन्यात हेंड्रिक्सनं 5 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या आगमनामुळं मुंबईच्या संघाची गोलंदाजी मजबूत होणार आहे.
VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'