IPL 2019 : चेन्नईविरोधात 'हा' होता रोहितचा मास्टर प्लॅन

IPL 2019 : चेन्नईविरोधात 'हा' होता रोहितचा मास्टर प्लॅन

पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई संघाला नमवत रोहित शर्माच्या मुंबई पलटननं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघावर सहज वियय मिळवत रोहित शर्माच्या मुंबई पलटननं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महत्त्वाची भुमिका बजावली ती, सुर्यकुमार यादवनं 54 चेंडूत 71 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईनं चेन्नईवर सहज विजय मिळवला.

दरम्यान या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं चेन्नईवर एवढा सहज विजय मिळेल अशी अपेक्षा नव्हती हे मान्य केलं. तर, यावेळी रोहितनं आपला मास्टरप्लॅनही सांगितला. चेपॉकचं मैदान फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्यामुळं आपल्या संघात तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली. तसेच, रोहितनं मान्यही केलं की, " चेन्नईचा संघ हा चांगलाच समतोल असल्यामुळं त्यांच्याविरुद्ध सामना खेळताना विशेष रणनीती आखावी लागली. म्हणुन आम्हीदेखील या सामन्यात चेन्नईविरुद्ध विशेष रणनीती आखली होती. पण आम्ही रणनितीची योग्य अमंलबजावणी केली याचा आनंद आहे मला’’.

वाचा- VIDEO : असं काय झालं की दुसऱ्याच चेंडूवर मुंबईला घ्यावा लागला डीआरएस?

तसेच, रोहितनं या विजयाचे श्रेय, आपल्या प्रमुख खेळाडूंना दिलं. ''चेन्नईच्या पहिल्या तीन फलंदाजांना झटपट बाद करणे आमचे ध्येय होते. राहुल चहर, कृणाल पंड्या आणि जयंत यादव या तिन्ही फिरकीपटूंनी ते ध्येय साधला याचा आनंद आहे. त्यांच्या भेदक माऱ्यामुळेच आम्हाला विजय मिळवला. सूर्यकुमार यादवचं योगदान महत्त्वाचचं होतं, त्यामुळं आम्ही सहजपणे अंतिम फेरीत पोहोचू शकलो'', असंही रोहित शर्मा म्हणाला.


प्ले ऑफमधील पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिलेलं 132 धावांचं आव्हान मुंबईने सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 19 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह मुंबईने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. दीपक चाहरच्या चेंडूवर अपील केल्यानंतर पंचानी रोहित शर्माला बाद दिले. त्यानंतर डीआरएसचा निर्णय रोहित शर्माने घेतला. त्यातही पंचांचा निर्णय़ योग्य असल्याने रोहित शर्मा बाद ठरला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून धडाक्यात सुरुवात केली. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

वाचा- मुंबईच्या 'या' खेळाडूचं मातृप्रेम! भरमैदानात अशी जागवली होती आईची आठवण

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात क्विंटन डीकॉक तंबूत परतला. त्याला हरभजनसिंगने 8 धावांवार बाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी 80 धावांची भागिदारी केली. इशान किशनला बाद करून इम्रान ताहीरने ही जोडी फोडली. इशानने 31 चेंडूत 28 धावा केल्या. त्याच्या पुढच्याच चेंडूवर ताहीरने कृणाल पांड्याला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने संघाचा विजय साजरा केला. सुर्यकुमार यादवने 54 चेंडूत 71 धावा केल्या.पांड्याने 11 चेंडूत 13 धावा केल्या.

वाचा- VIDEO : इतर संघांपेक्षा मुंबईची जास्त भीती? पाहा धोनी काय म्हणाला

VIDEO: यंदा राज्यात मध्यम पावसाची शक्यता, भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 09:17 AM IST

ताज्या बातम्या