VIDEO : फायनल जिंकूनही रोहितच ‘गली बॉय’, युवीसोबत गाजवली रात्र

VIDEO : फायनल जिंकूनही रोहितच ‘गली बॉय’, युवीसोबत गाजवली रात्र

हिटमॅन रोहित शर्माचा हा असा अंदाज तुम्ही कधीही पाहिला नसले....

  • Share this:

मुंबई, 13 मे: चेन्नईला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या षटकात मुंबईने एका धावेनं विजय साजरा केला.

मुंबईने दिलेलं 150 धावांचं आव्हान चेन्नई सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने सामन्यावर पकड मिळवली. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली. याच षटकात शेन वॉटसन धावबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करत मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला. याबरोबरच मुंबईनं इतिहास घडवला आणि सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं.

दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. त्याच्या नावावर कर्णधार म्हणून चार जेतेपदं जमा झाली आहेत. त्याचे हे एकूण पाचवे जेतेपद आहे. त्यामुळे या विजयाचे सेलिब्रेशन पण दणक्यात व्हायलाच हवे. सामना संपल्यानंतर हिटमॅन रोहितनं डान्स फ्लोअर गाजवला आणि त्याला सिक्सरकिंग युवराज सिंगची साथ मिळाली. यावेळी हिटमॅन रोहित शर्माचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. रोहित पार्टीच्या मुडमध्येच होता, त्यानं गली बॉयचं रॅप गायलं तर त्यावर थिरकला तो युवराज सिंग.

दरम्यान यंदाच्या हंगामात युवराजला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं त्यानं मुंबईकडून केवळ 4 सामने खेळला. मात्र मुंबईच्या विजयात तोही इतर खेळाडूंप्रमाणे सहभागी झाला होता. नेहमी मैदानावर गंभीर असणाऱ्या रोहितचा हा अवतार पाहून तुम्हीही थक्क व्हाल. याआधी चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या बायकोने त्याची मुलाखत घेतली. यावेळी तिने काही प्रश्न विचारले. मुलगी समायराच्या उपस्थितीत आयपीएलचं विजेतेपद पटकावल्यानंतर कसं वाटत आहे या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, फक्त समायराच नाही तर तुसुद्धा या मैदानावर उपस्थित होतीस याचा मला आनंद झाला. यानंतर रितिकाने रोहितला विचारलं की, सामना इतका रंगतदार होता की शेवटी मी डोळे झाकले. मला पाहता आलं नाही तु कसा खेळलास ? यावर रोहित म्हणाला की, मला खेळायचं होतं त्यामुळं डोळे बंद करू शकत नव्हतं. शेवटच्या षटके कशी असतात हे आम्हाला माहिती आहे. गेल्यावेळी मिशेल जॉन्सन होता तर आता मलिंगाने करून दाखवलं. शेवटी रितिका आणि रोहित यांनी एकमेकांचे अभिनंदन केलं.

वाचा- VIDEO : धोनी 2020 मध्ये IPL खेळणार की नाही?

दरम्यान, टॉस जिंकत मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पोलार्डच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं 150 धावा केल्या. वॉटसनची खेळी व्यर्थ गेली. त्याने 59 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. शेवटच्याच षटकात तो मलिंगाच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. दरम्यान मुंबईनं दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना ड्यु प्लेसिस बाद झाल्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायडू पाठोपाठ बाद झाले झाला. रैनाला राहुल चहरनं तर, रायडूला बुमराहनं बाद केले. रैना 8 धावांवर तर, रायडू केवळ एक धाव करत बाद झाला.

वाचा- MI vs CSK : फायनलमध्ये 'तू-तू, मैं-मैं', धोनीनं केला मोठा खुलासा

वाचा- पंचांसमोर अॅटिट्यूड दाखवणं पोलार्डच्या अंगलट, बर्थ डेला मिळालं शिक्षेचं गिफ्ट

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 13, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading