MI vs KKR : मुंबईच 'एक नंबर', रो'हिट'च्या खेळीनं कोलकाताचा खेळ खल्लास

मुंबईनं आपल्या होमग्राऊंडवर विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 11:24 PM IST

MI vs KKR : मुंबईच 'एक नंबर', रो'हिट'च्या खेळीनं कोलकाताचा खेळ खल्लास

मुंबई, 05 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील लीग सामन्यांतील शेवटचा सामना आज झाला. दरम्यान या सामन्यात मुंबईनं आपल्या होमग्राऊंडवर विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आली आहे. तर दुसरीकडं कोलकाताचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकातानं दिलेलं 134 धावांचं आव्हान 16.1 मुंबईनं ओव्हरमध्ये पार केलं. यात रोहितची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. त्याला सुर्यकुमार यादवनंही चांगली साथ दिली.

दरम्यान मुंबईच्या विजयामुळं हैदराबादच्या संघानं 12 धावांसह प्ले ऑफमध्ये एण्ट्री घेतली आहे. रोहितला सुर्यकुमार यादवनंही चांगली साथ दिली. मुंबईनं घेतलेला गोलंदाजीचा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मलिंगानं कोलकाचा सामन्याला कलाटणी मिळाली ती मलिंगाच्या 12व्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये मलिंगान कोलकाताला मोठा झटका देत कर्णधार दिनेश कार्तिक आणि तुफानी फलंदाज आंद्रे रसेल यांना बाद केले. मलिंगाच्या गोलंदाजीवर रसेलला भोपळाही फोडता आला नाही.मुंबईनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मुंबईचे फलंदाज सार्थ ठरवताना दिसत आहे. पण लिननं तुफानी सुरुवात करत 6 ओव्हरमध्ये कोलकाला 49 धावा करुन दिल्या. दरम्यान रोहितनं मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याच्या हातात चेंडू दिला आणि पहिल्याचा चेंडूत त्यानं शुभमन गिलला बाद केला. कोलकातासाठी गिल हा महत्त्वाचा खेळाडू असताना त्यांच्या विकेटचा फटका कोलकाताला नक्कीच बसणार आहे. त्यानंतर हार्दिकनं आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ख्रिस लिनला 41 धावांवर बाद केलं. त्यानंतर रॉबीन उथप्पानं खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 40 धावा करत बाद झाला.

Loading...कोलकाचा सामन्याला कलाटणी मिळाली ती मलिंगाच्या 12व्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये मलिंगान कोलकाताला मोठा झटका देत कर्णधार दिनेश कार्तिक आणि तुफानी फलंदाज आंद्रे रसेल यांना बाद केले. मलिंगाच्या गोलंदाजीवर रसेलला भोपळाही फोडता आला नाही. या ओव्हरमुळ कोलकाताच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगण्याच्या शक्यता आहे. या सामन्यात मलिंगानं 3 तर हार्दिक पांड्यानं 2 विकेट घेतल्या.

VIDEO : धोनीचा ‘गुरुमंत्र’, एका रात्रीत पलटला रैनाचा खेळ

VIDEO : 'काँग्रेसवालों....तुम्हारा यह डर मुझे अच्छा लगता है'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...