IPL 2019 : असा सामना होणे नाही...शेवटच्या चेंडूत मुंबई बनली चॅम्पियन

मलिंगानं शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेतली आणि सामना बदलला.

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 11:44 PM IST

IPL 2019 : असा सामना होणे नाही...शेवटच्या चेंडूत मुंबई बनली चॅम्पियन

हैदराबाद, 12 मे : शेवटच्या चेंडूवर मलिंगाची कमाल चालली आणि मुंबईहा सामना जिंकला. हा सामना एवढा अविश्वसनीय होता की, मुंबई जिंकली यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता. शेवटच्या सामन्यापर्यंत चेन्नई सामना जिंकेल असं वाटत असताना, मलिंगानं शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेतली आणि सामना बदलला. दरम्यान या सामन्यात शेन वॉटसनन चांगली फलंदाजी केली. यात शेन वॉटसनची 80 धावांची खेळी महत्त्वाची ठरली.



दरम्यान, टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पोलार्डच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं 150 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वॉटसननं चांगली फलंदाजी केली. 135.59च्या स्ट्राईक रेटनं वॉटसनन 8 चौकार आणि 4 षटकार मारत अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला. दरम्यान मुंबईनं दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना, आक्रमक फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाला सध्या ब्रेक लागला आहे. ड्यु प्लेसिस बाद झाल्यानंतर लगेचच काही चेंडूच्या फरकावर सुरेश रैना आणि अंबाती रायडू बाद झाला. रायडू आणि रैना या दोघांनी या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान रैनाला राहुल चहरनं तर, रायडूला बुमराहनं बाद केले. रैना 8 धावांवर तर, रायडू केवळ एक धाव करत बाद झाला. त्यामुळं मुंबईनं सामन्यात पुनरागमन केलं.


Loading...


दरम्यान मुंबईकडून पोलार्ड वगळता कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. पोलार्डनं चेंडूत धावा केल्या. 25 चेंडूत 41 धावा केल्या. तर, चेन्नईकडून दीपक चहरनं 4 ओव्हरमध्ये 6.50च्या सरासरीनं 26 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, इमरान ताहीर, शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मुंबईचा अर्धा संघ माघारी परतल्यानंतर पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी 40 धावांची भागीदारी केली. यात हार्दीकनं 10 चेंडूत 14 धावा केल्या. तर बर्थडे बॉय पोलार्डनं आक्रमक फलंदाजी केली. शार्दुल ठाकुरनं आपल्या 18 ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या. त्यानंतर लगेचच धोनीनं चहरच्या हातात चेंडू दिला आणि त्यांन धोनीचा विश्वास खरा ठरवला. केवळ 4 धावा देत त्यानं हार्दीक पांड्याला माघारी धाडलं. तर लगेचेच आपल्या भावाचीही विकेट घेतली. 19व्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा देत दोन विकेट घेतल्या.

वाचा- IPL 2019 : धोनी आणि रोहित नाही तर, फायनलमध्ये ‘तिची’ चर्चा

वाचा- IPL 2019 : धोनीची स्मार्ट खेळी, ट्रॅपमध्ये फसला रोहित

वाचा- IPL 2019 : कतरीना कैफ करणार MI ला सपोर्ट, पण सलमान म्हणतो...

मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...