CSK vs DC : वायझॅकचा 'किंग' धोनीचं, 'हे' रेकॉर्ड पाहून दिल्लीला फुटेल घाम !

वायझॅकचे मैदान धोनीच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 04:06 PM IST

CSK vs DC : वायझॅकचा 'किंग' धोनीचं, 'हे' रेकॉर्ड पाहून दिल्लीला फुटेल घाम !

चेन्नई, 10 मे : आयपीएलचा बारावा हंगाम संपण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना, मुंबईनं याआधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आज दिल्ली आणि चेन्नई यांच्यात होणारा दुसरा क्वालिफायर सामना आंध्र प्रदेशच्या वायझॅक मैदानावर होत आहे. यात जो संघ सामना जिंकेल तो, मुंबईशी आयपीएलमध्ये भिडणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वायझॅकचे मैदान धोनीच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहे. याच मैदानावर धोनीनं 2004मध्ये पाकिस्तान विरोधात आपली पहिलं एकदिवसीय शतक ठोकलं आहे. यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. वायझॅकच्या मैदानावर धोनीनं 7 एकदिवसीय सामन्यात 65च्या सरासरीनं 260 धावा केल्या आहेत.

याच मैदानावर धोनी खेळला IPLमधली ‘यादगार’ खेळी

धोनीनं आयपीएल 2016मध्या पुणे संघाकडून खेळत होता. दरम्यान याच मैदानावर पंजाबविरोधात धोनीनं अक्षर पटेलच्या शेवटच्या ओव्हरमधल्या चार चेंडूवर सलग 4 षटकार लगावले होते. याच मैदानावर धोनीनं 32 चेंडूत 64 धावांची खेळी केली होती. त्यामुळं आजच्या सामन्यातही चाहत्यांकडून अशाच खेळीची अपेक्षा आहे.

दिल्ली विरोधात धोनीची तुफानी खेळी

चेन्नईच्या चाहत्यांमध्ये ‘थाला’ या नावानं प्रचलित असलेला धोनी दिल्ली विरोधात तुफान फलंदाजी करतो. दिल्ली विरोधात 21 सामन्यात 37च्या सरासरीनं 563 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतक खेळींचा समावेश आहे. या हंगामात दिल्ली आणि चेन्नई यांच्यात दोन सामने झाले आहेत. त्यातील दोनही सामने चेन्नईनं जिंकले आहेत.

Loading...

आयपीएलचा रेकॉर्ड

या मैदानावर एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. यात 2012मध्ये 2, 2015मध्ये 3 तर, 2016मध्ये 6 सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी केलेला संघ 6 वेळा जिंकला आहे. तर, आव्हानाचा पाठलाग करताना 5 वेळा संघ जिंकला आहे.

हा आहे दिल्ली कॅपिटल्सचा ‘विक पॉईंट’

हैदराबाद विरोधात झालेल्या एलिमेनेटर सामन्यात दिल्लीनं विजय मिळवला असला तरी, या सामन्यातून दिल्ली संघाची कमकुवत बाजूही दिसून आली. हैदराबादनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, दिल्लीच्या फलंदाजांचा तारांबळ उडाली. राशिद खाननं दिल्ली विरोधात 4 ओव्हरमध्ये 15 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर, नाबीनंही जास्त धावा दिल्लीला करु दिल्या नाहीत. याचाच फायदा चेन्नई संघाला होऊ शकतो. चेन्नईच्या संघात इमरान ताहीर आणि हरभजसिंग असे दोन फिरकी गोलंदाज आहे. चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी यंदाच्या आयपीएलमध्ये 55 विकेट घेतल्या आहेत.

युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू सामना

दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामना म्हणजे युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू असा असणार आहे. दिल्लीच्या संघाकडे ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, समीर लाचिमने, किमो पॉल यांसारखे युवा खेळाडू आहेत. तर, चेन्नई संघाकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. महेंद्रसिंग धोनी, ड्युप्लेसिस, शेन वॉटसन, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो यांसारख्या खेळाडूंवर चेन्नईच्या संघाची मदार आहे.

हेड टू हेड

दिल्ली आणि चेन्नई आतापर्यंत 20 वेळा एकमेकांसमोर आले आहे. यात चेन्नईचं पारडं जास्त जड आहे. चेन्नईनं तब्बल 14 वेळा दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर, दिल्लीनं 6 सामन्यात चेन्नईला नमवलं आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई आणि दिल्ली 2 वेळा भिडले आहेत. या दोन्ही सामन्यात चेन्नईनं बाजी मारली आहे.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

वाचा- CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन

सॅम पित्रोदांच्या विधानावरून वाक् युद्ध, पंतप्रधान मोदी म्हणाले VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...