IPL 2019 : धोनीच्या नावावर आता आयपीएलच्या इतिहातला सर्वात मोठा विक्रम

IPL 2019 : धोनीच्या नावावर आता आयपीएलच्या इतिहातला सर्वात मोठा विक्रम

टी-20मध्ये फलंदाजांविषयी बोलायचे झाल्यास विराट कोहली, सुरेश रैना, गेल यांसारखे फलंदाज डोळ्यासमोर येतात. मात्र धोनीनं यासर्वांना मागे टाकले आहे.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : क्रिकेटमध्ये सध्या युवा खेळाडूंचा भरणा हा टी-20 क्रिकेट फॉरमेटमध्ये जास्त होतो. पण या फॉरमेटमध्ये सध्या युवा खेळाडू नाही तर, अनुभवी खेळाडूंचीची जास्त चलती आहे. त्यातच फिनीशर आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या एका रेकॉर्डनं त्याची चर्चा आता सगळीकडे होत आहे. त्यानं केलेला हा विक्रम मोडणं भल्या भल्या खेळाडूंनाही जमणार नाही.

हा फलंदाजांनाही टाकलं धोनीनं मागे

टी-20मध्ये फलंदाजांविषयी बोलायचे झाल्यास आपल्यासमोर विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, गेल यांसारखे फलंदाज डोळ्यासमोर येतात. मात्र, धोनीनं आता अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळं या सर्व फलंदाजांना मागे टाकत धोनी थेट पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

वाचा- IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

इतिहासतला सर्वात मोठा धोनीच्या नावावर

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 130वेळा खेळाडूंनी 400हून अधिक धाला केल्या आहे. मात्र कोणत्याही खेळाडूला धोनीच्या सरासरीनं धावा बनवता आल्या नाही आहेत. धोनीनं आयपीएलच्या बाराव्या हंगामात 135च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 2016मझ्ये विराटनं 81.08च्या सरासरीनं धावा केल्या होत्या.

वाचा-IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

सरासरीच्या यादीत धोनीच अव्वल

धोनी 2019- 135.00

विराट 2016- 81.08

धोनी 2018- 75.83

वॉर्नर 2019- 69.20

शॉन मार्श 2008- 68.44

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

पैशांची मागणी करणाऱ्या तरुणाला महिलेनं चपलेनं झोडपलं पाहा LIVE VIDEO

First published: May 8, 2019, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading