CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन

CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन

दिल्ली आणि चेन्नई आतापर्यंत 20 वेळा एकमेकांसमोर आले आहे. यात चेन्नईचं पारडा जास्त जड आहे.

  • Share this:

चेन्नई, 10 मे : आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाशी भिडेल. चेन्नई आणि दिल्लीच्या संघानं यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. मात्र, या संघाची मदार ही काही मुख्य खेळाडूंवर असल्यामुळं सांघिक खेळीत हे दोन्ही संघ मागे पडले आहे. दरम्यान एकीकडं दिल्ली संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे तर, दिल्लीच्या संघात अनुभवी खेळाडूंचा.

दरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या प्लेऑफ गटातील बादफेरीच्या सामन्यात दिल्लीनं शानदार विजय मिळवला. हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्लीनं अखेरच्या चेंडूवर 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यात महत्त्वाची भुमिका बजावली ती युवा खेळाडूंनी. मुळातच युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघातील पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी हैदराबाद विरोधात आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह दिल्ली आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईशी भिडणार आहे. तर, पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईनं निराशाजनक कामगिरी करत मुंबईकडून आपल्या घरच्या मैदानावर पराभव स्विकारला.

हा आहे दिल्ली कॅपिटल्सचा ‘विक पॉईंट’

हैदराबाद विरोधात झालेल्या एलिमेनेटर सामन्यात दिल्लीनं विजय मिळवला असला तरी, या सामन्यातून दिल्ली संघाची कमकुवत बाजूही दिसून आली. हैदराबादनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, दिल्लीच्या फलंदाजांचा तारांबळ उडाली. राशिद खाननं दिल्ली विरोधात 4 ओव्हरमध्ये 15 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर, नाबीनंही जास्त  धावा दिल्लीला करु दिल्या नाहीत. याचाच फायदा चेन्नई संघाला होऊ शकतो. चेन्नईच्या संघात इमरान ताहीर आणि हरभजसिंग असे दोन फिरकी गोलंदाज आहे. चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी यंदाच्या आयपीएलमध्ये 55 विकेट घेतल्या आहेत.

वाचा- IPL 2019 : कुंबळेनं काढला विराटवर राग, केलं संघातून डच्चू

वाचा- World Cup : केदार जाधवबाबत मोठा खुलासा, ‘ही’ डेडलाईन महत्त्वाची !

दिल्लीची मधली फळी कमकुवत

दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली सुरुवात करुन दिली आहे. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे दोन मधल्या फळीतले फलंदाज वगळता, इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू सामना

दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामना म्हणजे युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू असा असणार आहे. दिल्लीच्या संघाकडे ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, समीर लाचिमने, किमो पॉल यांसारखे युवा खेळाडू आहेत. तर, चेन्नई संघाकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. महेंद्रसिंग धोनी, ड्युप्लेसिस, शेन वॉटसन, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो यांसारख्या खेळाडूंवर चेन्नईच्या संघाची मदार आहे.

वाचा- DC vs CSK : चेन्नईचं पारडं जड, पण धोनीला दिल्लीच्या 'या' युवा खेळाडूंपासून खतरा !

वाचा- IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का, 120 सेकंदात फायनलचं स्वप्न भंगलं

हेड टू हेड

दिल्ली आणि चेन्नई आतापर्यंत 20 वेळा एकमेकांसमोर आले आहे. यात चेन्नईचं पारडा जास्त जड आहे. चेन्नईनं तब्बल 14 वेळा दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर, दिल्लीनं 6 सामन्यात चेन्नईला नमवलं आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई आणि दिल्ली 2 वेळा भिडले आहेत. या दोन्ही सामन्यात चेन्नईनं बाजी मारली आहे.


VIDEO: 'आधी पैसे आता मारहाण', प्रियंका गांधींचा भाजपवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: May 10, 2019 09:02 AM IST

ताज्या बातम्या