कोहलीची तळपायाची आग मस्तकात, पाहा नो-बॉल कॉन्ट्रोव्हर्सीवर काय म्हणाला...

कोहलीची तळपायाची आग मस्तकात, पाहा नो-बॉल कॉन्ट्रोव्हर्सीवर काय म्हणाला...

लसिथ मलिंगाच्या शेवटच्या चेंडूने सामन्यात नाट्यमय घडामोडी घडल्या

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. त्यातच शेवटच्या चेंडूवर नाट्यमय घडामोडी घडल्या. लसिथ मलिंगाच्या शेवटच्या षटकात बंगळुरूला सहा चेंडूत 17 धावांची आवश्यकता होती. पहिल्या पाच चेंडूत आरसीबीने 10 धावा काढल्या. अखेरच्या चेंडूवर अशक्यप्राय अशा 7 धावा पाहिजे होत्या. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं म्हणतात याचीच प्रचिती यावेळी आली.

मलिंगाने टाकलेला शेवटचा चेंडू नो-बॉल होता. मात्र पंचांचे त्याकडे लक्ष गेले नाही. तसेच पंचांच्या लक्षात येईपर्यंत सामन्याचा निर्णय होऊन मुंबईने जल्लोष सुरू केला होता.

वाचा : नो बॉलवर कोहली भडकला, रोहित शर्मा म्हणतो...

सामना संपल्यानंतर शेवटचा चेंडू नो- बॉल टाकल्याचे स्पष्ट झालं पण पंचांचा निर्णय अंतिम असल्यानं मुंबई इंडियन्सला विजयी घोषित करण्यात आलं. यानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आपला राग व्यक्त केला.

विराटने म्हटले की,'आयपीएलमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो हे माहीत असताना पंचांनी मैदानात त्यांचे डोळे उघडे ठेवून उभं राहिलं पाहिजे. दुसऱ्यांच्या चुकीचा फटका आम्हाला बसला.’

विराट म्हणाला की, आम्ही आयपीएलच्या पातळीवरचा खेळ केला तो क्लब  क्रिकेटसारखा नव्हता. पंचांची भूमिका मूर्खपणा केल्यासारखीच होती. सामना इतक्या रंगतदार स्थितीत होता आणि शेवटचा चेंडू असताना पंचांनी डोळे उघडे ठेवणं अपेक्षित होतं.

काठावर असा नाही तर इंचभर फरकाने तो नोबॉल होता. त्यांनी काळजीपूर्वक लक्ष देणं आणि अचूक निर्णय देणं अपेक्षित आहे असंही विराटने म्हटलं.

वाचा : गंभीरचा खळबळजनक खुलासा, 'अश्विनने फ्रिजमध्ये ठेवली होती अंतर्वस्त्रे'

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा पराभव केला आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इडियन्सने 187 धावा केल्या होत्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची खेळी केली तर शेवटी अष्टपैलू हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी करत 32 धावा केल्या.

मुंबईने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या टीमनेही जोरदार लढत दिली. परंतु त्यांना मुंबईने दिलेल्या आव्हान गाठणं शक्य झालं नाही. बंगळुरूचा डाव 20 षटकांत पाच बाद 181 धावांवर आटोपला. अखेर मुंबईने 6 धावांनी विजय मिळवला.

वाचा : रसेलची लकी चार्म, त्याच्या वादळी खेळीमागे 'ही' सुपरमॉडेल

First published: March 29, 2019, 8:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading