IPL 2019 : मुंबईला डबल दणका, रोहित शर्माला दंड

IPL 2019 : मुंबईला डबल दणका, रोहित शर्माला दंड

यंदाच्या आयपीएलमध्ये दंड करण्यात आलेला मुंबई इंडियन्स पहिलाच संघ

  • Share this:

मोहाली, 31 मार्च : किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. यंदाच्या आयपीएलमधील हा त्यांचा दुसरा विजय आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत मुंबईला 7 बाद 176 धावांवर रोखले. त्यानंतर 18.4 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात आव्हान पूर्ण करत विदय मिळवला.

मुंबईने सामना तर गमावलाच पण त्यासोबत कर्णधार रोहित शर्माला आयपीएलने दंडही ठोठावला आहे. संथ गतीने षटके टाकल्याबद्दल त्याला दंड करण्यात आला. यंदाच्या हंगामातील मुंबई हा पहिलाच संघ आहे ज्यांना दंड झाला आहे. रोहित शर्माला आयपीएलने 12 लाख रुपयांचा दंड केला आहे.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या या सामन्यात ख्रिस गेल, मयंक अगरवाल, केएल राहुल, डेविड मिलर यांच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. मुंबईकडून क्विंटन डी कॉकची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. तर कर्णधार रोहित शर्मानेही 32 धावा केल्या त्याला हार्दीक पांड्यानेही साथ दिली.

IPL 2019 : जेव्हा हार्दिक आपल्या भावाचा बदला घेतो तेव्हा, पाहा VIDEO

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई संघाच्या सलामी फलंदाजी रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली फलंदाजी केली.रोहित शर्मानं किंग्स इलेव्हन पंजाबच्या मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकात 12 धावा चोपल्या. त्यात दोन चौकारांचा समावेश होता. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईने 5 षटकातचं 50 धावा केल्या.

VIDEO : कृणालसमोरही आली होती अश्विन स्टाईल विकेट घेण्याची संधी, पण...

मात्र त्यानंतर रोहित शर्माची दुर्दैवी विकेट पडली. हार्डस विलजोनच्या गोलंदाजीवर रोहित पायचीत होऊन माघारी परतला. मात्र प्रत्यक्षात चेंडू लेग स्टम्पला लागत नसल्याचं उघड झालं. त्यामुळे योग्यवेळी रिव्ह्यु न घेतल्याचा फटका रोहितला बसला. तर, मुरुगन अश्विनने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला धक्का दिला. त्याने सूर्यकुमार यादवला पायचीत करताना किंग्स इलेव्हन पंजाबला दुसरे यश मिळवून दिले. क्विंटन डी कॉकनं चांगली फलंदाजी करत, आयपीएलमध्ये 1000 धावांचा पल्ला पार केला. अवघ्या 37 डावांत त्यानं ही कामगिरी केली. मात्र, मोहम्मद शमीनं 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डी कॉकला पायचीत केले. डी कॉकने 39 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा चोपल्या. त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

IPL 2019 : दिल्लीच्या 3 खेळाडूंनी मिळून कोलकाताच्या एका फलंदाजाला केले बाद, पाहा VIDEO

तर, मुरूगन अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात मुंबई संघाचे फलंदाज अडकले. मुरुगननं 4 ओव्हरमध्ये केवळ 25 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर, आर अश्विननं 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत किफायतशीर गोलंदाजी केली.

First published: March 31, 2019, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading