मुंबई, 05 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील लीग सामन्यांतील शेवटचा सामना आज आहे. प्लेऑफमधील तीन संघ ठरले असून चौथा संघ कोणता? हे आजच्या सामन्यानंतर ठरणार आहे.
मुंबई आणि कोलकाता यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर चौथ्या स्थानावर कोण हे निश्चित होईल. चेन्नई, दिल्ली आणि मुंबईनं प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. कोलकाता नाइटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. सनरायझर्स हैदराबादचे 12 गुण झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सने 13 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत.
Now it all comes down to the result of #MIvsKKR. #MI win #SRH go through as the first team in IPL history with 12 points. #KKR win, they go through.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) May 4, 2019
मुंबईने जर मोठ्या फरकाने कोलकाताला पराभूत केले तर सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते. असे झाल्यास 12 गुण मिळवूनही प्लेऑफ गाठणारा हैदराबाद आयपीएलच्या इतिहासात पहिलाच संघ ठरू शकतो.
पॉइंट टेबल
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...