मुंबई, 10 मे : आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात फायनल रंगणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईला त्यांच्याच घरात पराभूत करुन मुंबईनं थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला. चेन्नईने दिल्लीला पराभूत करून फायनलला धडक मारली. मुंबईची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी पाहता त्यांना विजेतेपदाचं दावेदार मानलं जात आहे.
अंतिम सामन्यातला शानदार रेकॉर्ड
2013मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या सहा वर्षात सर्वात जास्त यश मिळवलेला संघ आहे. मुंबईच्या संघानं 2013, 2015, 2017 अशी तीन विजेतेपदं मिळवली आहेत. त्यानंतर यंदा मुंबईच्या संघानं अंतिम सामन्यात धडक मारली आहे. एवढचं नाही तर मुंबईच्या संघाची अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. मुंबईचा संघ एकूण 4 वेळा अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्यात 3 वेळा त्यांनी विजेतेपद मिळवलं आहे. तर, चेन्नईनं 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015 आणि 2018मध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे. पण या संघानं केवळ तीन वेळा विजेतेपद मिळवलं आहे.
चेन्नई विरोधात सर्वात चांगलं प्रदर्शन
आयपीएलमधला सर्वात मोठा सामना म्हणजे मुंबई आणि चेन्नई यांच्यातला. दरम्यान या द्वंद्व युध्दात मुंबईचं प्रदर्शन जास्त चांगलं आहे. दोन्ही संघांनी एकूण 27 सामने खेळले आहेत. यात मुंबईनं 16 तर चेन्नईनं 11वेळा सामना जिंकला आहे. त्यामुळं जर चेन्नई अंतिम सामन्यात पोहचला तर, मुंबई फायनल जिंकू शकते.
दिल्लीच्या तुलनेत मुंबईचा संघ सर्वात संतुलित संघ
मुंबईचा संघ जास्त संतुलित वाटतो. कारण मुंबईकडे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, पोलार्ड, कृणाल पांड्या, चाहर, मयंक यांसारखे अनुभवी आणि युवा असे खेळाडू आहेत.
यशस्वी मधली फळी
आयपीएलच्या बाराव्या हंगामाच्या सुरुवातीला मुंबईच्या संघाच्या मधल्या फळीचा खेळा चांगला नव्हता. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, पोलार्ड, क्रुणाल पांड्या यांचा स्ट्राईट चांगला आहे. याचा फायदा मुंबईला नक्कीच होणार आहे.
आक्रमक गोलंदाजी
मुंबईसाठी फलंदाजी सोबत गोलंदाजांची मोठी कुमक आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गोलंदाजी सरस ठरली. मुंबईकडं सर्वश्रेष्ठ जलद गोलंदाज आहेत. यात बुमराह, मलिंगा यांचा समावेश आहे. अंतिम सामन्यात मलिंगाची कमी भासू शकते.
SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?