अश्विनच्या मंकडिंगमधून वाचण्यासाठी नेटकऱ्यांचा 'हा' जुगाड, पाहा VIDEO

अश्विनच्या मंकडिंगमधून वाचण्यासाठी नेटकऱ्यांचा 'हा' जुगाड, पाहा VIDEO

अश्विनने जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केल्यानंतर वादही निर्माण झाला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 एप्रिल : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती अश्विनने जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केलं त्याची. यानंतर अनेकांनी अश्विनवर अखिलाडुवृत्तीचा आरोप केला. तर काहींनी जोस बटलरवर तोच आरोप केला.

अश्विनने नियमानुसार जरी बाद केले असले तरी अनेक गोलंदाज त्यापूर्वी फलंदाजाला इशारा देतात. त्यानंतरही फलंदाज पुढे जात असेल तर बाद करतात. अश्विनच्या मंकडिंगची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. इतकंच काय तर मंकडिंगपासून वाचायचं कसं हे दाखवणारेही व्हिडिओ व्हायरल होतं आहेत.

एका युजरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मंकडिंगपासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून युजरने म्हटलं आहे की, अशी बॅट 2020 पर्यंत आणण्याचा आमचा विचार आहे.

पंजाबचा कर्णधार आर अश्विनने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरला नॉन स्ट्रायकर्स एंडला असताना स्टंप्स उडवून बाद केलं होतं. त्यानंतर मंकडिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मंकड आऊट म्हणजे काय?

40च्या दशकात भारताकडून खेळणारा सलामीवीर होता विनू मंकड. विनू मंकड डावखुरा स्लो बोलर म्हणूनही खेळत असे. भारताचा हा अष्टपैलू महान खेळाडू 1947-48 दरम्यान अशाच पद्धतीच्या वादात अडकला होता. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बोलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला.

यावरून ऑस्ट्रेलियाच्या संघाने थैमान घातलं. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनीही भारतीय गोलंदाज कसा चुकीचं वागला याबद्दल लिहून विनू मंकड यांच्याविरोधात रान उठवलं. आजही हे यापद्धतीनं धावबाद करणं खेळाच्या उस्फूर्त भावनेच्या विरोधात असल्याचं मानलं जातं. अशा पद्धतीने आऊट झालं की मंकड डिसमिसल असं म्हटलं जात. मंकडिंग असं क्रियापदच क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये रूढ झालं आहे.

First published: April 10, 2019, 7:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading