मुंबई, 05 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामातील लीग सामन्यांतील शेवटचा सामना आज आहे. प्लेऑफमधील तीन संघ ठरले असून चौथा संघ कोणता? हे आजच्या सामन्यानंतर ठरणार आहे. वानखेडेवर होत असलेल्या मुंबई आणि कोलकाता यांच्यातील हा सामना कोलकातासाठी करो या मरोचा सामना आहे.
दरम्यान या सामन्यात मुंबईनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मुंबईचे फलंदाज सार्थ ठरवताना दिसत आहे. पण लिननं तुफानी सुरुवात करत 6 ओव्हरमध्ये कोलकाला 49 धावा करुन दिल्या. दरम्यान रोहितनं मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याच्या हातात चेंडू दिला आणि पहिल्याचा चेंडूत त्यानं शुभमन गिलला बाद केला. कोलकातासाठी गिल हा महत्त्वाचा खेळाडू असताना त्यांच्या विकेटचा फटका कोलकाताला नक्कीच बसणार आहे. त्यानंतर हार्दिकनं आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ख्रिस लिनला 41 धावांवर बाद केलं.
पण कोलकाचा सामन्याला कलाटणी मिळाली ती मलिंगाच्या 12व्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये मलिंगान कोलकाताला मोठा झटका देत कर्णधार दिनेश कार्तिक आणि तुफानी फलंदाज आंद्रे रसेल यांना बाद केले. मलिंगाच्या गोलंदाजीवर रसेलला भोपळाही फोडता आला नाही. या ओव्हरमुळ कोलकाताच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगणार आहे.
Dinesh Karthik ✅
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2019
Andre Russell ✅
Lasith Malinga is having a good (K)night at the Wankhede 🚫🎇😋💙#OneFamily #CricketMeriJaan #MumbaiIndians #MIvKKR pic.twitter.com/1MIFf8MJDr
मुंबई आणि कोलकाता यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर चौथ्या स्थानावर कोण हे निश्चित होईल. चेन्नई, दिल्ली आणि मुंबईनं प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. कोलकाता नाइटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. सनरायझर्स हैदराबादचे 12 गुण झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सने 13 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत.
VIDEO : धोनीचा ‘गुरुमंत्र’, एका रात्रीत पलटला रैनाचा खेळ
VIDEO : 'काँग्रेसवालों....तुम्हारा यह डर मुझे अच्छा लगता है'