मुंबई इंडियन्सचा 'सिंग' बनला चेन्नईचा किंग, 24 चेंडूंत बदलला सामना

आयपीएलचा पहिला सामना अटीतटीचा होणार अशी अपेक्षा असताना, बंगळुरूच्या संघाने चेन्नईच्या संघासमोर नांगी टाकत संपूर्ण संघ केवळ 70 धावात बाद झाला.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 10:24 PM IST

मुंबई इंडियन्सचा 'सिंग' बनला चेन्नईचा किंग, 24 चेंडूंत बदलला सामना

 आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खेळला जात आहे. या मॅचमध्ये धोनीच्या एका गोलंदाजाने बंगळुरूच्या संघाला चारीमुंड्या चीत केले.

आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. या मॅचमध्ये धोनीच्या एका गोलंदाजाने बंगळुरूच्या संघाला चारीमुंड्या चीत केले.

धोनीने पॉवर प्लेमध्ये आधी मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगला दुसऱ्या ओव्हरमध्येच गोलंदाजी करण्यास सांगितले. आणि आपल्या केवळ चार ओव्हरर्स म्हणजेच 24 चेंडूत बंगळुरू संघाच्या पायाखालची जमीन सरकली.

आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा मासा गळाला लावत, बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीला केवळ सहा धावातच बाद केले. मोठा फटका मारण्याच्या नादात कोहलीने जडेजाच्या हातात अगदी सोपा झेल देत बाद झाला.

Loading...

लगेचच आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये विराटच्या संघाला दुसरा झटका दिला. मोईन अलीलाचा आपल्याच गोलंदाजीवर कॅच घेत बाद केले.

आपल्या चौथ्या ओव्हरमध्ये हरभजनने चेन्नईसाठी खतरनाक ठरणाऱ्या एबी डिव्हिलियर्सची शिकार केली आणि त्यालाही तंबूत पाठवले. तर, याच ओव्हरमध्ये हेतमेयर पण रन आऊट झाला.

हरभजन सिंहने आपल्या चार ओव्हरमध्ये केवळ 20 धावा देत तीन विकेट घेतं बंगळुरू संघाचं कंबरडं मोडलं.

तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत स्वत:च्याच गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनने अव्वल क्रमांक पटकावला आहे. हा पराक्रम करताना हरभजनने चेन्नईच्याच ड्वेन ब्राव्होला पिछाडीवर टाकले आहे. ब्राव्होने असा पराक्रम दहा वेळा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Mar 23, 2019 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...