...अन् हैदराबादचा सलामीवीर बसला लपून, पाहा VIDEO

पंजाबने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 08:34 PM IST

...अन् हैदराबादचा सलामीवीर बसला लपून, पाहा VIDEO

मोहाली, 8 एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज पंजाब इलेव्हन यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 22 वा सामना खेळला जात आहे. दरम्यान सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि केन विल्यम्सन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जॉनी बेअरस्टो दंगामस्ती करताना दिसत आहे.व्हाय़रल होणाऱ्या व्हिडिओत बेअरस्टो प्रँक करत आहे. हा व्हिडिओ सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात बेअरस्टो विमानात मागच्या सीटवर लपून बसतो. तिथून केन विल्यम्सन जाताना त्याला भीती दाखवतो.

वाचा : 76 चेंडूत 210 धावा, 24 चौकार आणि 13 षटकार

Loading...

पंजाब आणि हैदराबाद यांच्यात होत असलेल्या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघांनी यंदाच्या आयपीएलमध्ये समान गुण मिळवले आहेत. पंजाब आणि हैदराबादच्या दोन्ही संघांनी 5 सामन्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे.

वाचा : IPL मध्ये तिसऱ्यांदा स्टंपने केला घोटाळा, फलंदाज बादच होईना, पाहा VIDEO

पंजाबने संघात दोन बदल केले आहेत. मुरुगन अश्विन आणि अँड्र्यू टाय यांना विश्रांती देत त्यांच्याऐवजी मुजीब उर रहमान आणि अंकित राजपूत यांना संधी देण्यात आली आहे.

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...