News18 Lokmat

IPL 2019 : KKR ला घरच्या मैदानावर SRH चे आव्हान

कोलकत्ता नाइटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना रविवारी सायंकाळी 4 वाजता सुरु होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 03:58 PM IST

IPL 2019 : KKR ला घरच्या मैदानावर SRH चे आव्हान

कोलकत्ता, 24 मार्च : आयपीएलच्या 12 व्या हंगामात कोलकत्ता नाइट रायडर्सचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. KKR ला दोनवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरला 2018 संघात घेतले नव्हते तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर दिनेश कार्तिकला संघात घेऊन त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या हंगामात गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले.

कोलकाताने आतापर्यंत 2011, 2016, 2017, 2018 ला प्लेऑफमध्ये धडक मारली होती. तर 2012, 2014 ला गंभीरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. केकेआरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 164 सामने खेळले असून त्यातील 86 सामन्यात विजय तर 77 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले.

कोलकत्ता नाइटरायडर्स : दिनेश कार्तिक(कर्णधार), सुनिल नारायण, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, जो डेनली, लॉकी फर्ग्युसन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, हॅरी गर्नले, कुलदीप यादव, पीयूष चावला, नितीश राणा, संदीप वॉरियर, केसी करियप्पा, शुभमन गिल, श्रीकांत मुंधे, निखिल नाईक, पृथ्वी राज, प्रसिद्ध कृष्णा

सनरायझर्स हैदराबाद 2013 मध्ये आयपीएलच्या मैदानात उतरले आहे. त्यांनी 2013, 2017 आणि 2018 च्या हंगामात प्ले ऑफपर्यंत मजल मारली. तर 2016 मध्ये त्यांनी आयपीएलचे विजेतेपद पटकावून सर्वांनाच चकीत केले होते.

हैदराबादने आतापर्यंत आयपीएलमध्ये 93 सामने खेळले आहेत. त्यातील 51 मध्ये विजय तर 41 सामन्यात पराभव झाला आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. गेल्या वर्षी डेविड वॉर्नरला चेंडू कुरतडल्याप्रकरणी संघाबाहेर रहावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत केन विल्यमसनने नेतृत्व केले होते. यंदाही केन विल्यम्सनकडेच नेतृत्व देण्यात आले आहे.

Loading...

हैदराबाद सनरायझर्स : केन विल्यम्सन (कर्णधार), डेविड वॉर्नर, अभिषेक शर्मा, जॉनी बेअरेस्टो, खलील अहमद, रिकी भुई, बासिल थम्पी, श्रीवत्स गोस्वामी, मार्टिन गुप्टिल, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद नबी, शाहबाज नदीम, टी. नटराजन, मनीष पांडे, युसूफ पठाण, राशिद खान, वृद्धीमान साहा, संदीप शर्मा, विजय शंकर, शाकिब अल हसन, बिली स्टेनलेक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...