...आणि दिलेलं वचन पूर्ण होताच विराट बाद झाला

...आणि दिलेलं वचन पूर्ण होताच विराट बाद झाला

विराटने कोलकाताविरुद्ध 58 चेंडूत शतकी खेळी केली. विजयानंतर बोलताना त्याने मित्राला दिलेलं वचन पूर्ण केल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.

  • Share this:

कोलकाता, 20 एप्रिल : शुक्रवारी इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कोलकाताविरुद्ध खेळताना आरसीबीने 20 षटकांत 213 धावा केल्या. यात विराट कोहलीचे शतक आणि मोइन अलीच्या अर्धशतकाचा समावेश होता.

आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता सामना जिंकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाले होते. शेवटी विराटसेनेने 10 धावांनी निसटता विजय मिळवला. विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.कोलकाता नाइट रायडर्सने 213 धावांचा पाठलाग करताना नीतीश राणा (नाबाद 85) आणि आंद्रे रसेल (65 धावा)यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 203 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीचा हा यंदाच्या हंगामातील फक्त दुसरा विजय आहे.

IPL 2019 : शतकासाठी स्वार्थी झाला विराट, संघापेक्षा शतक महत्त्वाचे?

शुक्रवारी झालेल्या सामन्यात एबी डीव्हिलियर्सला मुकावे लागले होते. त्यामुळे सामन्याआधी त्याला वचन दिले होते की, शतक करूनच पॅव्हेलियनमध्ये परत येईन. माझ्या या कामगिरीमुळे एबी आनंदी असेल असं कोहली सामन्यानंतर म्हणाला.

कार्तिकची चूक केकेआरला पडली खूप महागात

मुंबईविरुद्ध खेळताना झालेल्या दुखापतीने एबीला कोलकात्यात खेळता आले नाही. बुमराहचा उसळता चेंडू लागल्याने त्याला दुखापत झाली होती. त्या सामन्यात डीव्हिलियर्सने 51 चेंडूत 75 धावा केल्या होत्या.

रावसाहेब दानवे माझी मेहबूबा, खोतकरांच्या वक्तव्याने प्रचारसभेत हशा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 12:32 PM IST

ताज्या बातम्या