IPL 2019 : दोन दोस्तांमध्ये लढत, KKR vs KXIP मध्ये रंगणार सामना

IPL 2019 : दोन दोस्तांमध्ये लढत, KKR vs KXIP मध्ये रंगणार सामना

कोलकत्त्याच्या ईडन गार्डनवर आज कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होणार आहे.

  • Share this:

कोलकाता, 27 मार्च : आयपीएल 2019 ला जोरदार सुरुवात झाली आहे. दररोज रोमहर्षक लढती बघायला मिळत आहेत. बुधवारी कोलकत्त्यातील ईडन गार्डनवर होणाऱ्या KKR vs KXIP सामन्यात दोन दोस्तांमध्ये लढत होणार आहे.

पंजाबकडून युनिवर्सल बॉस ख्रिस गेल आणि कोलकाताकडून खेळणारा जमैकन जायंट आंद्रे रसेल हे दोघे एकमेकांविरोधात लढणार आहेत. विशेष म्हणजे गेल आणि रसेल दोघेही त्यांच्या त्यांच्या संघांचे आधारस्तंभ आहेत. आयपीएलमधील पहिल्या सामन्यांमध्ये दोघांनीही जबरदस्त फलंदाजी केली होती.

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गेलने पहिल्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. त्याने 79 धावांची खेळी केली होती. तर रसेलनेही वेगवान खेळी करत 19 चेंडूत 49 धावा काढल्या होत्या.

कोलकाता नाइट रायडर्स सलग दुसऱ्या विजयासाठी तयार आहे तर पंजाबचा संघही आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

कोलकत्ता नाइटरायडर्स : दिनेश कार्तिक(कर्णधार), सुनिल नारायण, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, जो डेनली, लॉकी फर्ग्युसन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, हॅरी गर्नले, कुलदीप यादव, पीयूष चावला, नितीश राणा, संदीप वॉरियर, केसी करियप्पा, शुभमन गिल, श्रीकांत मुंधे, निखिल नाईक, पृथ्वी राज, प्रसिद्ध कृष्णा

किंग्स इलेवन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), अग्निवेश अयाची, हरप्रीत बरार, मोईस हेन्रिक्स, केएल. राहुल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, एंड्रू टाय, ख्रिस गेल, अंकित राजपूत, मुरुगन अश्विन, करुण नायर,वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, सॅम करेन, डेविड मिलर, सरफराज खान, मुजीब उर रहमान, सिमरन सिंह, एच. विजॉन, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नाळकांडे

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading