एका धावेनं पृथ्वी शॉचं शतक हुकलं, 10 वर्षापूर्वीचा 'तो' विक्रम अबाधित

नर्वस नाइंटीजची शिकार झालेला पृथ्वी शॉ विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या पंक्तीत

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 01:04 PM IST

एका धावेनं पृथ्वी शॉचं शतक हुकलं, 10 वर्षापूर्वीचा 'तो' विक्रम अबाधित

शनिवारी फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. दिल्लीला शेवटच्या षटकात 6 धावा काढता न आल्याने धावसंख्या समान झाली.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ नर्वस नाइंटीजची शिकार झाला. त्याने 55 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 99 धावा केल्या. अवघ्या एका धावेने त्याचे शतक हुकले.

कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज लोकी फर्ग्युसनच्या चेंडूवर यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती झेल देऊन पृथ्वी शॉ बाद झाला. यामुळे 19 वर्ष 141 वय असलेला पृथ्वी सर्वात कमी वयात शतक करण्याच्या विक्रमापासून दूर राहिला.

Loading...

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम मनीष पांडेच्या नावावर आहे. त्याने 21 मे 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना नाबाद 114 धावा काढल्या होत्या. तेव्हा त्याचे वय 19 वर्ष 253 दिवस इतके होते.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एका धावेने शतक हुकणारा पृथ्वी शॉ तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट आणि रैनाचे शतक हुकले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 01:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...