IPL 2019 : खलील आणि पॉलची जुनी दुश्मनी, 3 वर्षानंतरही घेता आला नाही बदला

IPL 2019 : खलील आणि पॉलची जुनी दुश्मनी, 3 वर्षानंतरही घेता आला नाही बदला

वेस्ट इंडिडचा या खेळाडूनं याआधीही खलीलच्या हातातून सामना खेचून घेतला होता.

  • Share this:

विशाषापट्टणम, 09 मे : दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या प्लेऑफ गटातील बादफेरीच्या सामन्यात दिल्लीनं शानदार विजय मिळवला. हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्लीनं अखेरच्या चेंडूवर 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यात महत्त्वाची भुमिका बजावली ती युवा खेळाडूंनी. मुळातच युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघातील पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी हैदराबाद विरोधात आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या. अमित मिश्राच्या रना आऊटनंतर सामना पालटेल असे वाटत असताना, शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना, कीमो पॉलनं खलील अहमदच्या चेंडूवर चौकारा खेचत दिल्लीला विजय मिळवून दिला. पण पॉल आणि खलीली यांच्यात हे पहिल्यांदाच घडले आहे असे नाही. वेस्ट इंडिडचा या खेळाडूनं याआधीही खलीलच्या हातातून सामना खेचून घेतला होता.

वाचा- मिश्राची 'ती' चूक दिल्लीला पडली असती महागात, पाहा VIDEO

खलील घेऊ शकला नाही बदला

ऋषभ पंतच्या तुफानी फटकेबाजीमुळं हैदराबादला शेवटच्या 6 चेंडूत 5 धावांची गरज होती. दरम्यान युवा गोलंदाज खलीली अहमदच्या हातात चेंडू देण्यात आला. खलीलनं याआधीच्या तीन ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाजी केली होती. तर, शेवटच्या ओव्हरमध्येही भेदक मारा करत शेवटच्या दोन चेंडूत 2 धावांची गरज असताना, पॉलनं चौकार खेचत सामना संपावला. पण याआधीही पॉल आणि खलील शेवटच्या ओव्हरमध्ये एकमेकांसमोर आले आहेत.

rong>वाचा- VIDEO : 2 चेंडूत 3 विकेट तरीही हॅट्ट्रिक नाही, पाहा क्रिकेटमधील अनोखी घटना

2016च्या अंडर 16 वर्ल्ड कप दरम्यान अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज आणि भारत यांच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये खलील आणि पॉल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यावेळी विंडीजच्या किमो पॉलने खलिल अहमदच्या गोलंदाजीवर चौकार लगावत विजयी धाव काढली होती. आज तब्बल ३ वर्षांनी किमो पॉलनेच खलिलच्या गोलंदाजीवर चौकार लगावत दिल्लीच्या संघाला विजय मिळवून दिला.

अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: May 9, 2019 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading