कम्पाउंडरचा 'हा' मुलगा एका रात्रीत झाला कोट्यधीश, गाजवतोय सध्या IPL

हा खेळाडू अगदी तुमच्या आमच्या सारखा मध्यम वर्गातला, डॉक्टर बनावं अशी घरच्यांची अपेक्षा असलेला असा.

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 08:13 AM IST

कम्पाउंडरचा 'हा' मुलगा एका रात्रीत झाला कोट्यधीश, गाजवतोय सध्या IPL

हैदराबाद, 03 मे : आयपीएलच्या बाराव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपलं नशीब आजमावलं. काही खेळाडू यशस्वी ठरले तर काही खेळाडू फक्त मॅच बॉय बनून राहिले. यातच एक नाव सध्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात गाजतयं. हा खेळाडू अगदी तुमच्या आमच्या सारखा मध्यम वर्गातला, डॉक्टर बनावं अशी घरच्यांची अपेक्षा असलेला असा.

राजस्थानमधून आपल्या क्रिकेटला सुरुवात करणाऱ्या या कम्पाउंडरचा मुलगा म्हणजे हैदराबाद सनरायजर्सचा जलद गोलंदाज खलीली अहमद. मात्र खलीलचं नशीब झळकलं जेव्हा 2018च्या आशियाई कपदरम्यान त्यांची वर्णी थेट भारताच्या एकदिवसीय संघात झाली. मात्र त्यावेळी त्याला सामना खेळता आला नाही. त्यानं 2018 साली हॉंग कॉंगकडून आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. दरम्यान 2018च्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दौऱ्यानंतर खलील अहमद मुश्ताक अली टुर्नामेंट खेळून घरी परतत असताना, त्याला बातमी कळली. ज्या बातमीनं त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं.

खलीलला आयपीएलच्या लिलावात सनरायजर्स हैदराबाद संघानं तब्बल तीन कोटी रूपयांना विकत घेतले. कम्पाउंडर असलेल्या त्याच्या बाबांसाठी हे जणू एक स्वप्नच होत. मात्र त्याच्या बाबांना त्यानं शिकावं आणि नोकरी करावी अशी माफक अपेक्षा होती, त्यामुळं ते त्याच्या क्रिकेटच्या विरोधात होते. अखेर खलीलीचे प्रशिक्षक इम्तियाज यांनी त्याच्या बाबांना समजावलं. आपल्या मुलानं डॉक्टर बनावं अशी अपेक्षा असताना, आपला मुलगा क्रिकेटर बनला आणि तोही सध्या आयपीएलमध्ये भल्याभल्या फलंदाजांची दांडी गुल करत आहे.

खलीलनं 2016-17 मध्ये राजस्थानमधून टी-20 टुर्नामेंटमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. एवढचं नाही तर, खलील 2016च्या अंडर 19 विश्वचषक संघातही होता. खलील राजस्थानमधून रणजी क्रिकेटही खेळतो. दरम्यान हैदराबादकडून खेळण्याच्या आधी खलील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातही होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, हैदराबादचा खलील आता प्रमुख गोलंदाजच झाला आहे. खलीलनं 7 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहे.

दरम्यान गुरुवारी मुंबई विरोधात झालेल्य सामन्यात खलीलनं 42 धावा देत महत्त्वाच्या तीन विकेट घेतल्या. यात रोहित शर्माची विकेट संघासाठी महत्त्वाची ठरली. मध्यमवर्गील घरातून आलेला हा युवा खेळाडू, डॉक्टर बनावं या वडिलांच्या अपेक्षेविरोधात जाऊन क्रिकेटर झाला. आणि आज हाच खेळाडू क्रिकेटचं मैदान गाजवत आहे.

Loading...


VIDEO : गडचिरोली स्फोटाबाबत गाफील राहिलात का? पोलीस महासंचालक म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: May 3, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...