OMG ! चेन्नईच्या होमग्राऊंडवर बुमराहला मिळणार का हॅट्रिकची संधी ?

OMG ! चेन्नईच्या होमग्राऊंडवर बुमराहला मिळणार का हॅट्रिकची संधी ?

चेन्नई आणि मुंबई यांच्यात मंगळवारी चेपॉकवर प्ले ऑफमधला पहिला सामना होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 05 मे : आयपीएलच्या बाराव्या हंगामाची सुरुवात मुंबईनं पराभवापासून केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी सर्व सामने जिंकत प्ले ऑफमध्ये एण्ट्री केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ आपल्या चौथ्या विजेतेपदासाठी उत्सुक आहे. दरम्यान कोलकाताला पराभूत करत मुंबईनं आयपीएलमधलं अव्वल स्थान काबीज केलं.

मुंबईच्या संघानं साखळी फेरीतला शेवटचा सामना आपल्या होम ग्राऊंडवर कोलकाताच्या विरोधात खेळला. हा सामना प्ले ऑफमध्ये कोणता संघ प्रवेश करणार यासाठी खुप महत्वाचा होता. दरम्यान कोलकाता विरुद्धच्या सामन्यात रोहितनं प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत कोलकाताला 133 धावांत रोखले. पण कोलकाचा सामन्याला कलाटणी मिळाली ती मलिंगाच्या 12व्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये मलिंगान कोलकाताला मोठा झटका देत कर्णधार दिनेश कार्तिक आणि तुफानी फलंदाज आंद्रे रसेल यांना बाद केले. मलिंगाच्या गोलंदाजीवर रसेलला भोपळाही फोडता आला नाही. दरम्यान कोलकातानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं 16.1 ओव्हरमध्येय विजय मिळवला. या विजयासह मुंबई पहिल्या क्रमांकावर आली आहे.

दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहनं उत्कृष्ठ गोलंदाजी केली. केवळ तीन धावा देत त्यानं 2 विकेट घेतल्या. शेवटच्या दोन चेंडूत बुमराहनं विकेट घेतल्यामुळं त्याला प्ले ऑफमध्ये हॅट्रइक घेण्याची संधी आहे. प्ले ऑफचे सामन्यांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. दरम्यान मुंबईच्या सामन्यात जर पहिल्याच चेंडूत बुमराहनं विकेट घेतली तर, त्याची आयपीएलमधली पहिली हॅट्रिक असेल.

आयपीएलमध्ये साखळी सामने संपले असून आता प्ले ऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान प्लेऑफच्या शर्यतीमधून किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना संधी मिळाली नाही. तर, मुंबईच्या विजयामुळं थेट हैदराबाद सनरायजर्सनं प्ले ऑफमध्ये एण्ट्री घेतली. सध्या मुंबईचा संघ 18 गुणासंह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुंबई आणि चेन्नई मंगळवारी चेपॉकवर प्ले ऑफच्या पहिल्या सामन्यात भिडतील. तर दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात दुसरा सामना होणार आहे.

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

VIDEO : धोनीचा ‘गुरुमंत्र’, एका रात्रीत पलटला रैनाचा खेळ

VIDEO : 'काँग्रेसवालों....तुम्हारा यह डर मुझे अच्छा लगता है'

First published: May 6, 2019, 7:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading