IPL 2019 : कसोटी नाही तर टी-20 मधलं खणखणीत नाणं, दिल्लीसाठी ठरला हुकुमी एक्का

IPL 2019 : कसोटी नाही तर टी-20 मधलं खणखणीत नाणं, दिल्लीसाठी ठरला हुकुमी एक्का

या खेळाडूमुळं दिल्लीच्या संघानं 2012नंतर पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 मे : भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्माची सध्या आयपीएलमध्ये चलती आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या या गोलंदाजानं प्रत्येक सामन्यात दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा दिला आहे. त्याच्या गोलंदाजीमुळे दिल्लीच्या संघानं तब्बल पाच वर्षांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. पण इशांत शर्माचा आयपीएलमधला प्रवास तितका सोपा नव्हता. कारण त्याला कसोटी गोलंदाज याच नावानं ओळखलं जायचं त्यामुळं तब्बल दोन वर्ष त्याला कोणत्याही संघानं विकत घेतलं नाही.

आयपीएलमध्ये इशांतनं आतापर्यंत 11 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहे. मात्र त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागली. याबाबत दिल्ली कॅपिटल्स संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मोहम्मद कैफनं इशांत शर्माची तारिफ करत त्याचा आयपीएलमधल्या प्रवासाबद्दल माहिती दिली. इशांत शर्मांच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. मात्र, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत त्यांनं उत्कृष्ठ गोलंदाजी केली. मात्र यामुळं त्याच्या तो फक्त कसोटी क्रिकेटच खेळू शकतो, अशी त्याची ओळख निर्माण झाली.

दिल्ली कॅपिटल्स संघानं इशांत शर्माला तब्बल 1.10 कोटींना विकत घेतले होते. मात्र, याआधीच्या हंगामात कोणत्याही संघानं इशांतला जागा दिली नव्हती. त्याआधी 2014 ते 2017 दरम्यान इशांत केवळ 17 सामने खेळला. त्यात त्याला फक्त पाच विकेट घेता आल्या. यामुळं त्याला 2018 साली कोणत्याही संघानं विकतं घेतलं नाही. खरंतर इशांत शर्मानं भारतासाठी मोठं योगदान दिलं आहे. मात्र त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटचा ठप्पा पडल्यानंतर इशांत शर्मा थेट इंग्लंडमध्ये कॉऊंट्री क्रिकेटमध्ये गेला.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीनं 2012नंतर यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्य प्रवेश केला. यात इशांत शर्मानं चांगली गोलंदाजी केली आहे.

SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

First published: May 5, 2019, 5:19 PM IST
Tags: ipl 2019

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading