IPL 2019 : 44 हजार कोटींचा खेळ, जाणून घ्या कशी होते कमाई

IPL 2019 : 44 हजार कोटींचा खेळ, जाणून घ्या कशी होते कमाई

आयपीएलने केवळ जगभरातील दिग्गज खेळाडू एकत्र आणले नाही, तर कॉर्पोरेट कंपन्यांनांही या खेळात उतरवले. मात्र या खेळातून कमाई कशी होते याचे कुतूहल अनेकांना आहे. जाणून घ्या याबद्दल थोडक्यात...

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : आयपीएलच्या 12 व्या हंगामाचा शुभारंभ उद्यापासून होत आहे. एकीकडे यावेळी आठ संघ या रणसंग्रामात एकमेकांविरोधात लढतील तर दुसरीकडे या खेळातून अनेक कंपन्या कोट्यवधी रुपयांची कमाई करतील. खरतर गेल्या 11 वर्षांत IPLची किंमत शून्यावरून हजारो कोटींपर्यंत पोहचली आहे. ग्लोबल व्हॅल्युएशन अँण्ड कार्पोरेट फायनान्स अ‍ॅडवायजर कंपनीने दिलेल्या अहवालानुसार 2019च्या आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 44 हजार कोटी एवढी झाली असल्याचे म्हटले आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 टक्के वाढ झाली असून आयपीएलचा व्यवसाय वार्षिक 18.9 टक्क्यांनी वाढत आहे.

व्यवसाय, मनोरंजन आणि खेळ असे अनोखे मिश्रण असलेला हा खेळ सुरु करण्यामागे ललित मोदी यांची कल्पना होती. 2008 मध्ये सुरु झालेल्या आयपीएलला कमी वेळातच जास्त लोकप्रियता मिळाली. आयपीएलने केवळ जगभरातील दिग्गज खेळाडू एकत्र आणले नाही, तर कॉर्पोरेट कंपन्यांनांही या खेळात उतरवले. मात्र या खेळातून कमाई कशी होते याचे कुतूहल अनेकांना आहे. जाणून घ्या याबद्दल थोडक्यात,


असे होतात, खेळाडू कोट्याधीश


Loading...

इतर व्यवसायांप्रमाणेच IPLमध्येही ग्राहकच राजा असतो. त्यामुळेच IPLमध्ये संघ हे भारताच्या प्रमुख राज्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन, खेळाडूंना लिलावात खरेदी केले जाते. त्याचबरोबर IPLच्या विविध जाहीरातींमधूनही खेळाडूंना पैसा मिळतो.


या कारणांमुळे IPL बनला 44 हजार कोटींचा खेळ


सध्या विवो ही मोबाईल कंपनी आहे. या कंपनीने तब्बल 1079.29 कोटींना IPLची प्रायोजकता खरेदी केली आहे.  IPLमध्ये एक रेवेन्यू डिस्ट्रिब्यूशन मॉडल आहे, जेथून बीसीसीआय प्रसारक म्हणून कोट्याधी रुपये कमवते. यातूनच आपली फी कापून, बीसीसीआय उरलेली रक्कम ही इतर संघांमध्ये वाटते. दरम्यान, IPLच्या एकूण कमाईच्या 60-70 टक्के वाटा हा माध्यमांना दिलेल्या प्रसारण अधिकारातून कमविले जातात. तर, तिकीट विक्री आणि प्रायोजकता यातूनही या कंपन्यां 20-30 टक्के फी कमवतात, यंदाच्या आयपीएलमध्ये ही रक्कम वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे यंदा 18.9 टक्क्यांनी वाढलेला आयपीएलचा व्यवसाय पाहता, आयपीएल अंती ही रक्कम 50 हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.


आमिर झाला म्हातारा, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 03:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...