बंगळुरूचा 'हा' खेळाडू म्हणतो आयपीएल वर्ल्ड कपपेक्षा भारी !

बंगळुरूचा 'हा' खेळाडू म्हणतो आयपीएल वर्ल्ड कपपेक्षा भारी !

बंगळुरूच्या या खेळाडूनं साऊथ आफ्रिकेसोबत खेळताना 2015 साली विश्वचषकात आपल्या देशाचं नेतृत्व केलं आहे.

  • Share this:

बंगळुरू, 04 मे : आयपीएलचा बारावा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आला असताना, सध्या प्ले ऑफसाठी चुरस रंगली आहे. मात्र, या सगळ्यातून आधीच बाहेर पडलेला संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ, कारण हा साखळी सामन्यात बाहेर गेला आहे. या हंगामात सर्वात वाईट खेळ हा विराटच्या सेनेचा झाला आहे.

दरम्यान, या सगळ्यात बंगळुरु संघाचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं. एबीच्या मते, आयपीएल ही जगातील सर्वात चांगली स्पर्धा आहे. एवढचं नाही तर, आयपीएलही विश्वचषकापेक्षा भारी स्पर्धा आहे, असं वक्तव्य एबीनं केलं आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना एबीनं, ''जगातील कोणतीही स्पर्धा ही आयपीएलच्या आसपास नसुन. मी जगभरातील जवळजवळ सर्व स्पर्धा खेळलो आहे. त्यामुळं मी हे वक्तव्य करु शकतो'', असे मत व्यक्त केलं.

मात्र, एबीच्या या वक्तव्यामुळं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हाच खेळाडू 2015च्या विश्वचषकात साऊथ आफ्रिकेला पराभव स्विकारावा लागल्यामुळं भर मैदानात रडला होता. त्यावेळी एबी कर्णधार होता, मात्र आता एबीनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

एबीनं आयपीएलची प्रशंसा करताना, “या स्पर्धेत सहभागी होताना खुप चांगल वाटतं. ही स्पर्धा खुप जलद आहे’’. दरम्यान आयपीएलच्या या हंगामात एबीला चांगली फलंदाजी केली आहे. त्याचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, त्यानं 12 सामन्यात 49च्या सरासरीनं 441 धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. आज बंगळुरूचा संघ हैदराबाद विरोधात लढत आहे. हा सामना हैदराबादसाठी महत्त्वाचा असला तरी, बंगळुरू त्यांना या स्पर्धेच्या बाहेर काढू शकते.

वाचा- IPL 2019 : शाहरुखचा विकेण्ड विराटच्या हाती, 240 चेंडूत ठरणार KKRचं भवितव्य

IPL 2019 : आसामच्या 'या' खेळाडूचा झंझावती विक्रम, द्रविडच्या शिष्यांनाही टाकलं मागे

VIRAL VIDEO : बर्थ डे बम्पस देताना बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू? हे आहे सत्य!

First Published: May 4, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading