IPL मुळे World Cup पूर्वी भारतीय संघाचं नुकसान

भारतीय खेळाडू आणि त्यांची आयपीएलमधील कामगिरी यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 03:02 PM IST

IPL मुळे World Cup पूर्वी भारतीय संघाचं नुकसान

आयपीएलच्या 12 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात चेन्नईला पराभूत करून चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. यंदाचे आयपीएल अनेक वादांमुळे गाजलं. यात  भारतीय संघाला वर्ल्ड कपपूर्वी धक्का देणाऱ्या घटना घ़़डल्या आहेत .

भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आयपीएलमध्ये जखमी झाला. वर्ल्ड कपच्या आधी तो तंदुरुस्त झाला असला तरी त्याला सराव सामन्यात खेळता येईल की नाही हे सांगता येत नाही. जर सराव सामने न खेळता तो वर्ल्ड कपमध्ये उतरल्यास तिथे चांगल्या कामगिरीचे आव्हान त्याच्यासमोर असेल.

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवसाठी यंदाचे आयपीएल काही खास नव्हते. त्याने 9 सामन्यात फक्त 4 विकेट घेतल्या. कोलकाताकडून खेळणाऱ्या या गोलंदाजाला आयपीएलमध्ये विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. वर्ल्ड कपपूर्वी त्याचा कमी झालेला आत्मविश्वास उंचावण्यासाठी भारताचा माजी कर्णधार धोनीने त्याला मेसेज पाठवला.

Loading...

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला तब्बल 8 सामन्यात पराभव पत्करावा लागला. तर 14 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला होता. यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. सुरुवातीच्या सलग सहा सामन्यातील आरसीबीच्या पराभवानंतर  कोहलीच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली.

आयपीएलमध्ये बहुतांश संघात प्रशिक्षक किंवा कर्मचारी परदेशी खेळाडू होते. दिल्ली कॅपिटल्स या संघात भारताचा सलामीवीर शिखर धवन खेळत असून, या संघाच्या प्रशिक्षकपदावर रिकी पॉंटिंग तर, दिल्लीचा संघ विश्लेषक श्रीराम सोमायाजुला हे श्रीलंकन होते. त्यामुळं अर्थातच या दोन्ही प्रशिक्षकांना धवनच्या कमकुवत बाजू आणि बलस्थानं समजली आहेत. त्यामुळं या गोष्टी विश्वचषकाच्या दृष्टीनं भारतीय संघाला महागात पडू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2019 03:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...