IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

चेन्नईच्या या गोलंदाजामुळं एकवेळ अशीही आली होती, जेव्हा चेन्नई सामन्यात पुनरागमन करु शकते, अशी शक्यता वर्तविली जात होती.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघावर सहज वियय मिळवत रोहित शर्माच्या मुंबई पलटननं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महत्त्वाची भुमिका बजावली ती, सूर्यकुमार यादवनं 54 चेंडूत 71 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईनं चेन्नईवर सहज विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीमुळं मुंबईनं सामना जिंकला. पण चेन्नईच्या या गोलंदाजामुळं एकवेळ अशीही आली होती, जेव्हा चेन्नई सामन्यात पुनरागमन करु शकते, अशी शक्यता वर्तविली जात होती.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग या सामन्यात मुंबईचे खेळाडू चमकले असले तरी चेन्नई संघातून खेळणाऱ्या इम्रान ताहिरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ताहीरनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 300 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. मुंबई विरोधात झालेल्या झालेल्या सामन्यात इम्राननं भेदक मारा करत, मोक्याच्या क्षणी ईशान किशन व कृणाल पांड्या या दोघांना माघारी धाडले. ताहीरनं 4 ओव्हरमध्ये 33 धावा देत 2 विकेट घेतल्या. दरम्यान या सामन्यात कृणाल पांड्याची विकेट घेत ताहिरनं 300 बळी घेण्याचा विक्रम केला.

वाचा-IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

ताहीर हा 300 बळी घेणारा जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या स्थानी 488 बळींसह ड्वेन ब्राव्हो आहे. तर दुसऱ्या स्थानी 377 बळींसह लसिथ मलिंगा आहे. त्यानंतर सुनील नरेन (370), शाकिब अल हसन (343), शाहिद आफ्रीदी (333), सोहेल तन्विर (326) या गोलंदाजांचा क्रमांक लागतो. तर, इम्रान ताहिर हा 300 बळी घेणारा जगातील चौथा फिरकी गोलंदाज झाला आहे. दरम्यान, प्ले ऑफमधील पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिलेलं 132 धावांचं आव्हान मुंबईने सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 19 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह मुंबईने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला.


वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

पैशांची मागणी करणाऱ्या तरुणाला महिलेनं चपलेनं झोडपलं पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 01:12 PM IST

ताज्या बातम्या