IPL 2019 : IIT मद्रासला कूल धोनीची चिंता, परीक्षेत विचारला 'हा' प्रश्न

IPL 2019 : IIT मद्रासला कूल धोनीची चिंता, परीक्षेत विचारला 'हा' प्रश्न

आज चेन्नईच्या चेपॉकवर मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला क्वालिफायर सामना होणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 07 मे : क्रिकेटच्या दुनियेत महेंद्रसिंग धोनीची एक वेगळीच ओळख आहे. सामन्याच्याआधीच धोनी कोणता निर्णय घेणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साखळी सामन्यात पंजाबविरोधात दोन ओव्हरमध्ये हरभजन सिंगला 41 धावा चोपल्या तरी, धोनीनं हरभजनला एक संधी दिली आणि त्यानं धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. हरभजननं लगेच तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल आणि गेलची विकेट घेतली.

आज प्ले ऑफमध्ये धोनीच सामना विजयरथावर असलेल्या मुंबई संघासोबत होणार आहे. मूंबईच्या संघानं साखळी सामन्यात कोलकाताला नमवून पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. चेन्नईच्या घरच्या मैदानावर आज प्ले ऑफमधला पहिला सामना होणार आहे. मात्र, त्याआधीच आयआयटी मद्रासला धोनीची चिंता आहे. आयसीसीनं आपल्या इन्स्टाग्रामवर आयटीटी मद्रासच्या पेपरचा फोटो टाकला. ज्यात धोनीच्या निर्णयावर एक महत्त्वाचा प्रश्व विचारला गेला.

आयआयटी मद्रासच्या पेपरमध्ये प्रो. विग्नेशनं वास्तविक जीवनावर एक प्रश्न विचारला होता. यात धोनीच्या एका मॅचचे उदाहरण देण्यात आले होते. प्ले ऑफच्या सामन्यात धोनीनं टॉस जिंकला तर तो कोणता निर्णय घेईल असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

वाचा- VIDEO : धोनीबद्दल ‘कॉमेंटेटर’ असं काय बोलला की, साक्षीला हसू आवरता आलं नाही

आयआयटीला धोनीची चिंता

आयआयटी मद्रासनं, कोणत्याही सामन्यात नाणेफेकीचा निर्णय महत्त्वाचा आहे. चेपॉकच्या मैदानावर दव असल्यामुळं चेंडू काहीप्रमाणात स्विंग होऊ शकतो. त्यामुळं स्पिनरच्या अडचणी वाढतील. याता चेन्नईचं वातावरण पाहता आद्रता 70 टक्के असावी. तर, सामना सुरु होईल तेव्हा किमान तापमान 39 असून शकते. त्यामुळं जर धोनीनं टॉस जिंकला तर तो, गोलंदाजी घेणार की फलंदाजी ?, असा प्रश्न विचारला.

दरम्यान, सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईला फायनलला पोहचण्याासाठी दोन संधी मिळतील. क्वालिफायर 1 मध्ये जिंकल्यास त्यांना थेट फायनलचे तिकिट मिळेल. जर पराभूत झाले तर त्यांना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळून पुन्हा फायनलला पोहचण्याची संधी असेल.

वाचा-'या' खेळाडूचं दुखापतींशी जुनं नातं, तरी वर्ल्ड कप संघात मिळाली संधी

SPECIAL REPORT: बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमधील संघर्ष शिगेला

First published: May 7, 2019, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading