मुंबई, 06 मे : मुंबई आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईनं सामना जिंकत कोलकाताचं आयपीएलमधलं आव्हान संपवलं तर, हैदराबादला प्ले ऑफचं तिकीट मिळालं. मुंबईच्या या विजयामुळं पहिल्यांदा हैदराबादचा संघ 12 गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहचला आहे.
सनरायजर्स हैदराबादनं आयपीएलच्या बाराव्या हंगामात केवळ 6 सामने जिंकले आहेत. मात्र त्यांचा रनरेट कोलकातापेक्षा चांगला असल्यामुळं त्यांना प्ले ऑफमध्ये संधी मिळाली. दरम्यान, हैदराबादच्या चाहत्यांनी ट्विटरवरुन मुंबई संघाचे आभार मानले. पण त्यांची आभार व्यक्त करण्याची पध्दत हटके होती, त्यांनी चक्क मिम बनवत मुंबईचे आभार मानले.
वाचा- VIDEO : शाहरुखच्या संघातील 'हा' खेळाडू ठरला खलनायक
— Team Mahesh Babu (@Prudhvi34510373) May 5, 2019
यात काही चाहते रोहित शर्माचे आभार हात जोडून करत आहे, असे मिम बनवले आहेत.
— Gupta p (@Guptamb24) May 5, 2019
काही चाहत्यांनी तर, दिल वाले दुल्हनिया ले जायेंगेचा सिन वापरुन मिम बनवले.
Summary of tonight's match n playoffs ♀️#OrangeArmy#RiseWithUs#MIvKKR pic.twitter.com/VJknGpr14c
— Shwetha (@shwetha0811) May 5, 2019
तर काही चाहत्यांनी रॉबीन उथप्पा याच्यामुळं मुंबईनं सामना जिंकला असे म्हणत मुंबईचा प्लेयर ऑफ द मॅच रॉबीन उथप्पाच असल्याचं मिममधून ट्विट केलं.
Fbb stylish player and Game Changer of the match award goes to "Robbie uthappa" pic.twitter.com/CBPYmP8Wgs
— madhav Simma (@madhavasimma) May 5, 2019
वाचा- VIDEO : बाप-लेकीचं अनोखं नात, अर्धशतकानंतर रोहितचं डॅडी सेलिब्रेशन
दरम्यान आता मंगळवारपासून प्ले ऑफ सामन्यांना सुरुवात होणार आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यातील झालेल्या सामन्यामुळं आयपीएलच्या 12 व्या हंगामातील प्लेऑफमधील संघांचा निर्णय झाला आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्क केलं आहे, मुंबईने 18 गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे चेन्नई आणि दिल्ली आहे. तर 12 गुण मिळवून हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईला फायनलला पोहचण्याासाठी दोन संधी मिळतील. क्वालिफायर 1 मध्ये जिंकल्यास त्यांना थेट फायनलचे तिकिट मिळेल. जर पराभूत झाले तर त्यांना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळून पुन्हा फायनलला पोहचण्याची संधी असेल.
वाचा-मुंबई इंडियन्सचा 'हा' लक फॅक्टर, यंदा मारणार विजेतेपदाचा चौकार!
VIDEO : पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'च्या कार्यकर्त्यांचा भाजप उमेदवारावर हल्ला