'कॉफी विथ करण' वादावर पांड्याने सोडलं मौन, वाचा काय म्हणाला

'कॉफी विथ करण' वादावर पांड्याने सोडलं मौन, वाचा काय म्हणाला

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवून देण्यात पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

  • Share this:

मुंबई, 04 एप्रिल : भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या हार्दीक पांड्याने गेल्या सात महिन्याचा काळ आयुष्यातील सर्वात कठिण काळ असल्याचे म्हटले आहे.  महिलांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणीत आल्यानंतर पुढे काय करायचे हे देखील समजत नव्हते असं त्यानं म्हटलं आहे.

मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध विजय मिळवून देण्यात हार्दीक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली होती. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून त्याला मायदेशी पाठवण्यात आलं होतं.

पांड्याची चौकशी लांबल्यानंतर त्याच्यावरील निलंबन मागे घेण्यात आलं. आता या वादाला आपण विसरून गेलो असल्याचे पांड्या म्हणाला. चेन्नई विरुद्ध विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवेळी म्हटले की, संघाच्या विजयात चांगली भूमिका पार पाडता आल्याने बरं वाटत आहे. गेल्या सात महिन्यापासून क्वचितच मी खेळू शकलो. माझ्यासाठी हा काळ खूप कठिण होता.  मला काय करायचे आहे तेच सुचत नव्हते. मी माझ्या फलंदाजीवर लक्ष देत होतो. माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याची इच्छा आहे. अशी फलंदाजी करणं आणि विजय मिळवून देणं हा चांगला अनुभव असल्याचं पांड्या म्हणाला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पांड्याने 8 चेंडूत 25 धावा केल्या. याशिवाय त्याने गोलंदाजीतही कमाल केली. पांड्याने तीन विकेट घेतल्या. या जोरावरच मुंबईने चेन्नईवर 37 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार त्याने कठिण काळात साथ दिलेल्या लोकांना अर्पण करत असल्याचे म्हटले.

हार्दीक पांड्या म्हणाला की, मी दुखापतीने बाहेर होतो. त्यानंतर वाद निर्माण झाला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार माझे कुटुंबीय आणि अशा मित्रांना अर्पण करू इच्छितो ज्यांनी मला साथ दिली. आता माझे लक्ष खेळावर असून आगामी विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील.

VIDEO : 'हमारे पास मोदीजी है', मुख्यमंत्र्यांची हिंदीतून टोलेबाजी

First published: April 4, 2019, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading