मुलीचं भाकित ठरलं खरं, चेन्नईने शेअर केला VIDEO

मुलीचं भाकित ठरलं खरं, चेन्नईने शेअर केला VIDEO

चेन्नई आणि कोलकात्याच्या सामन्यापूर्वी केलं होतं भाकित

  • Share this:

चेन्नई, 10 एप्रिल : मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 7 गडी राखून विजय मिळवला. मात्र, या सामन्याचं भाकित हरभजनच्या मुलीने वर्तवलं होतं. हरभजन सिंगची मुलगी हिनायाने सामन्याच्या एक दिवस आधी चेन्नईच जिंकणार असं म्हटलं होतं. हिनायाचा हा व्हिडिओ हरभजनची पत्नी गीता बसराने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटरवरही आहे.

चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओत हिनायाला विचारण्यात येतं की, आजचा सामना कोण जिंकणार? याच्या प्रत्युत्तरादाखल हिनायाने म्हटलं की पापा. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलं की, पापा कोणत्या संघात आहेत? यावर तिने सीएसके म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज असं उत्तर दिलं. त्यानंतर तिने पुन्हा पुन्हा सीएसके असं म्हटलं.

मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने जबरदस्त गोलंदाजी केली. 4 षटकांत 15 धावा देत 2 विकेट घेतल्या. याशिवाय दीपक चहरने 4 षटकांत 20 धावा देत 3 गडी बाद केले तर इम्रान ताहिरने 2 गडी बाद केले. यामुळे चेन्नईने कोलकाताला 20 षटकांत 108 धावात रोखले. त्यानंतर चेन्नईने 109 धावांचे आव्हान 17.2 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह चेन्नई गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहचली.

VIDEO : 'अशा नेत्याला राष्ट्रवादीतून हाकला' ऐकताच धनंजय मुंडे पोट धरून हसले

First published: April 10, 2019, 1:09 PM IST

ताज्या बातम्या