IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का, 120 सेकंदात फायनलचं स्वप्न भंगलं

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का, 120 सेकंदात फायनलचं स्वप्न भंगलं

आयपीएलचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 09 मे : सध्या भारतात आयपीएलचं ज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. दरम्यान चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवून मुंबईनं फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. आयपीएलचा अंतिम सामना 12 मे रोजी होणार आहे. तर, दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीनं विजय मिळवत फायनलच्या दिशेनं आगेकूच केली आहे. शुक्रवारी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात जो संघ बाजी मारेल तो मुंबईसोबत फायनल खेळेल.

दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून सर्व क्रिकेटरसिक अंतिम सामन्याची वाट पाहत होते. मात्र आता क्रिकेट चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्याची सर्व तिकिटे ही केवळ 120 सेकंदात विकली गेली आहेत, अशी माहिती BCCI नं दिली आहे. यामुळं मुंबईचे चाहते चांगलेच भडकले आहेत, कारण BCCIनं कोणतीही पूर्वसूचना न देता अंतिम सामन्याची तिकिटे विक्रीसाठी खुली केली. यावरून BCCI वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही तिकीट विक्रीसाठी खुलं करण्यात आल्याची माहिती दिली होती. मत्र 2 मिनीटांत फायनल हाऊसफुल झाली.

वाचा- IPL 2019 : श्रेयस म्हणतो...मेरे भाई जैसा कोई हार्डीच नहीं है !

आयपीएलचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान या स्टेडियमची आसन क्षमता 39 हजारांपेक्षा अधिक आहे. माक्ष, BCCIच्या वतीनं एकूण तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होती याबाबत काहीही कल्पना देण्यात आली नाही. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार 1000 ते 22 हजार 500 या किमतीची तिकिटे विकली जाणे अपेक्षित होती. पण तिकीटविक्री करणाऱ्या कंपनीने मात्र केवळ 1500, 2000, 2500 आणि 5000 किमतीची तिकिटे विकली. त्यामुळं बाकीची तिकीटे गेली कुठे, असा सवाल क्रिकेटचे चाहते विचारत आहे.

दरम्यान शुक्रवारी चेन्नई आणि दिल्ली यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना होत असून, यात जो संघ बाजी मारेल तो संघ मुंबई सोबत भिडणार आहे.

वाचा- IPL 2019 : खलील आणि पॉलची जुनी दुश्मनी, 3 वर्षानंतरही घेता आला नाही बदला

अभिनयापेक्षा स्वरा भास्करची राजकारणात का होतेय चर्चा, पाहा SPECIAL REPORT

First published: May 9, 2019, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading