VIDEO : फायनलमध्ये शार्दुलची भन्नाट कॅच नाही पाहिली तर काय पाहिलं

VIDEO : फायनलमध्ये शार्दुलची भन्नाट कॅच नाही पाहिली तर काय पाहिलं

चेन्नई आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात मैदान गाजवलं ते दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर या युवा खेळाडूंनी.

  • Share this:

हैदराबाद, 12 मे : आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला सामना हायवोल्टेज होणार यात काही वाद नाही. मुंबईनं नाणेफेक जिंकत प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय रोहितला महागात पडला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाला केवळ 150 धावा करता आल्या. यात पोलार्डची 41 धावांची खेळी महत्त्वाची ठरली.

मात्र या सामन्यात गाजले ते दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर. चेन्नईकडून दीपक चहरनं 4 ओव्हरमध्ये 6.50च्या सरासरीनं 26 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, शार्दुल ठाकुरनं एक भन्नाट कॅच घेतली. या कॅचनं सर्वांच्या भुवया उंचावल्या, कारण त्यावेळी शार्दुलचं गोलंदाजी करत होता. मुंबईचे फलंदाज संयतपणे फलंदाजी करत होता. यावेळी कृणाल पंड्या खेळत होता. शार्दुलने एक बाऊन्सर पंड्याच्या दिशेने टाकला. पंड्याला हा चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही आणि हा चेंडू हवेत उडाला. त्यावेळी शार्दुलने धावत जात अफलातूल झेल पकडला.

चेन्नईच्या गोलंदाजंनी भेदक मारा करत मुंबईला धावांवर रोखले. यात दीपक चहरची गोलंदाजी महत्त्वाची ठरली. दरम्यान ब्राव्होनं आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ धावा दिल्या. दरम्यान मुंबईकडून पोलार्ड वगळता कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. पोलार्डनं चेंडूत धावा केल्या. 25 चेंडूत 41 धावा केल्या. तर, चेन्नईकडून दीपक चहरनं 4 ओव्हरमध्ये 6.50च्या सरासरीनं 26 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, इमरान ताहीर, शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

धोनीची स्मार्ट खेळी, ट्रॅपमध्ये फसला रोहित

शार्दुल ठाकूरच्या 4 ओव्हरमध्ये डी कॉक बाद झाल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये धोनीनं एक स्मार्ट डाव खेळला. त्याच्या या जाळ्यात रोहित शर्मा अडकला आणि दीपक चहरनं रोहितला बाद केलं. त्यामुळं पाच ओव्हरमध्येच सलामीचे फलंदाज माघारी परतले. रोहित 15 धावा करत बाद झाला. धोनीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा चोपलेल्या दीपकला पुन्हा गोलंदाजी दिली. आणि या ओव्हरमध्ये धोनीचं हे नाणं खणखणीत वाजलं. एकही धावा न देता रोहितला दीपकनं बाद केलं.

वाचा- IPL 2019 : धोनी आणि रोहित नाही तर, फायनलमध्ये ‘तिची’ चर्चा

वाचा- IPL 2019 : धोनीची स्मार्ट खेळी, ट्रॅपमध्ये फसला रोहित

वाचा- IPL 2019 : कतरीना कैफ करणार MI ला सपोर्ट, पण सलमान म्हणतो...

मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO

First published: May 12, 2019, 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading