IPL 2019 : तारीख आणि ठिकाणही ठरलं, चेन्नई नाही तर 'या' शहरात होणार फायनल

IPL 2019 :  तारीख आणि ठिकाणही ठरलं, चेन्नई नाही तर 'या' शहरात होणार फायनल

आतापर्यंत आयपीएलच्या परंपरेनुसार प्ले ऑफचे सामने विजेत्या आणि उपविजेत्या संघांच्या मैदानावर खेळवले जातात.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल 2019च्या अंतिम सामन्याची तारीख घोषित करण्यात आली आहे. हा सामना रविवार, 12 मे रोजी होणार आहे. पण हा सामना चेन्नईच्या चेपॉकवर होणार अशी अपेक्षा असताना, आयत्यावेळी हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर वळवण्यात आला आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशननं स्टेडियममधील I, J आणि K हे स्टँड प्रेक्षकांसाठी खुले करण्यास नकार दिल्याने, हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आहे.

आता चेन्नईच्या चेपॉकवर पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. तर विशाखापट्टणम येथे एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वालिफायरचे सामने होतील. दरम्यान चेन्नईत 6,10, 14 मेला स्थानिक निवडणुका होत असल्यानं सुरक्षेच्या कारणावरुन अंतिम सामना हलवण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत आयपीएलच्या परंपरेनुसार प्ले ऑफचे सामने विजेत्या आणि उपविजेत्या संघांच्या मैदानावर खेळवले जातात. मात्र, बीसीसीआयनं विशाखापट्टणमची निवड केली. हैदराबादने 2018साली आयपीएलच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषविले होते.

बीसीसीआयचे अधिकारी विनोद राय,''तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनशी आम्ही चर्चा केली आहे. परंतु तीन रिकामे स्टँड्स ही समस्या आहे. हैदराबाद आणि बंगळुरू हे दोन स्टेडियम दोन प्ले ऑफ, एलिमिनेटर आणि फायनलसाठी पर्याय म्हणून ठेवण्यात आले आहेत.'', यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

VIDEO : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर गुंडांचा भीषण हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 06:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading