नवी दिल्ली, 04 मे: मुंबईकर श्रेयस अय्यरच्या दिल्ली संघानं प्ले ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान आज राजस्थानला नमवुन दिल्लीनं गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. यात रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थाननं दिलेलं किरकोळ आव्हान पार केलं. राजस्थानच्या गोलंदाजांनी ही चिवट टक्कर दिली. इश सोढीनं तीन विकेट घेत, काहीकाळ दिल्लीचा विजय पुढं नेला. परंतु दिल्लीनं 16व्या षटकातच घरच्या मैदानावर झालेल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला.
राजस्थाननं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र सर्वच फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर रियान परागनं आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला 116 धावांचे किरकोळ आव्हान दिलं. प्रत्युत्तरात दिल्लीला 28 धावांवर पहिला धक्का बसला. इश सोढीनं दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनला 16 धावांवर बाद केलं. पुढच्याच चेंडूवर सोढीनं पृथ्वी शॉला त्रिफळाचीत केले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर दिल्लीन आपला विजय पुढं नेला.
.@RishabPant777 finishes the game with his 5⃣th six to get to a #VIVOIPL fifty and give @DelhiCapitals a 5 wicket win over #RR 🔥#DCvRR pic.twitter.com/yrvf4sNt7B
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2019
दरम्यान श्रेयस गोपाळने ही जोडी तोडली. त्याने अय्यरला 15 धावांवर बाद केलं. पंत आणि कॉलीन इंग्रामने दिल्लीचा विजय निश्चित केला. या दोघांची 22 धावांची भागीदारी सोढीनं संपुष्टात आणली. पण 16व्या षटकातच दिल्लीनं राजस्थानवर विजय मिळवला. रिषभ पंतनं 38 चेंडूत 53 धावा केल्या.
.@RishabPant777 hits his 86th six for @DelhiCapitals to go past Virender Sehwag as their record six-hitter in #VIVOIPL 💪#DCvRR pic.twitter.com/BfJ0u8s9lQ
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2019
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना, रियान पराग 50 धावांच्या जोरावर राजस्थाननं 100 गाठली. याच्या अजिंक्य रहाणे आणि लिएम लिव्हिंगस्टोन यांनी सलामीला येत संयमी सुरुवात केली. मात्र दुसऱ्याच षटकात राजस्थानला इशांत शर्मानं पहिला धक्का दिली. शर्मानं राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला केवळ 2 धावांवर बाद केलं. त्यानंतर लिव्हिंगस्टोनने फटकेबाजी केली, परंतु शर्माने चौथ्या षटकात लिव्हिंगस्टोनचा त्रिफळा उडवला. राजस्थानचे सलामीचे 2 फलंदाज 20 धावांवर माघारी परतले होते.
त्यानंतर रियान पराग आणि श्रेयस गोपाळ हे राजस्थानचा डाव सावरतील असे वाटत असताना, त्यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. 12व्या षटकात अमित मिश्राने ही जोडी तोडली. मिश्राच्या फिरकीचा अंदाज चुकल्याने गोपाळ यष्टिचीत होऊन माघारी परतला. गोपाळने 18 चेंडूंत 12 धावा केल्या. तर, स्टुअर्ट बिन्नीही पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता माघारी फिरला. रिषभ पंतने त्याचा झेल घेतला.
VIDEO: इथे पाण्यासाठी 2 किमी करावी लागते पायपीट