DCvsMI : सामन्याआधी दिल्लीला दणका, सेनापतीशिवाय मुंबईविरुद्ध लढणार

DCvsMI : सामन्याआधी दिल्लीला दणका, सेनापतीशिवाय मुंबईविरुद्ध लढणार

दिल्ली आणि मुंबई यांच्यात गुरुवारी फिरोजशहा कोटला मैदानावर सामना होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल : फिरोजशहा कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात गुरुवारी सामना होणार आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाल्याने कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. सरावादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 266 धावा केल्या आहेत.

दिल्ली आणि मुंबई या दोन्हींमध्ये जोरदार सामना होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी गेल्या सामन्यात विजय मिळवला असून आयपीएलमध्ये समान गुण आहेत.

दिल्लीच्या फिरोजशहा कोटलाची खेळपट्टी संथ आहे. त्यामुळे या मैदानावर खेळणं कठिण जाणार आहे. या मैदानावर कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दिल्लीने शेवटच्या तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईची आयपीएलमध्ये कामगिरी मिश्र राहिली आहे.

...तर पंत, रायडु आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

कोटलाच्या खेळपट्टीबद्दल दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने नाराजी व्यक्त केली होती. मात्र ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पूरक करण्याची शक्यता कमी आहे.

भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर

First published: April 18, 2019, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading