VIDEO : शेवटच्या चेंडूवर 'असा' षटकार, विराट झाला नाराज!

VIDEO : शेवटच्या चेंडूवर 'असा' षटकार, विराट झाला नाराज!

एबी डीव्हिलियर्सनंतर दिल्लीच्या या फलंदाजाने एका हाताने षटकार मारला.

  • Share this:

दिल्ली, 28 एप्रिल : आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी बघायला मिळते. यावेळी फलंदाजांचे वेगवेगळ्या शैलीतले फटके दिसतात. पंजाबविरुद्धच्या सामन्यात एबी डीव्हिलियर्सने एका हाताने मारलेल्या षटकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता दिल्लीच्या शेरफेन रुदरफोरडनेसुद्धा असाच फटका मारला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रुदरफोर्डनं 13 चेंडूत 28 धावांची वेगवान खेळी केली. यात त्याने तीन षटकार मारले. नवदीप सैनीच्या शेवटच्या फुलटॉस चेंडूवर षटकार लगावला. सामन्यानंतर या षटकारानंतर मलाही विश्वास बसला नव्हता असं रुदरफोर्ड म्हणाला.

रुदरफोर्डच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने शेवटच्या दोन षटकांत 36 धावा केल्या. 19व्या षटकात अक्षर पटेल आणि रुदरफोर्ड यांनी 16 धावा काढल्या तर शेवटच्या षटकात 20 धावा केल्या.

VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ

First published: April 28, 2019, 6:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading