VIDEO : पहिल्या चेंडूवर नशिबाची साथ मिळूनही हा खेळाडू ठरला 'अनलकी'

VIDEO : पहिल्या चेंडूवर नशिबाची साथ मिळूनही हा खेळाडू ठरला 'अनलकी'

दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : मंगळवारी झालेल्या प्लेऑफमधील पहिल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्याच चेंडूवर डीआरएस घेण्याच निर्णय घेतला. मात्र, त्याला याचा फायदा झाला नव्हता. बुधवारी इलिमिनेटरच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध हैदराबादचे सलामीवीर वृद्धीमान साहा आणि मार्टिन गुप्टिल प्रथम फलंदाजीला मैदानात उतरले. पहिल्याच चेंडूवर साहाला मैदानावरील पंचांनी बाद दिले. यावेळी साहाने मार्टिन गुप्टीलशी चर्चा करून डीआरएसचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी त्याला नॉट आऊट दिलं.


मात्र, त्याला या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही. तिसऱ्या षटकात तो 8 धावांवर झेलबाद झाला.


यपीएलच्या 12 व्या हंगामातील प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बाद फेरीचा सामना चेपॉकवर होत आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवून फायनलसाठी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पोहचण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.

गुणतक्त्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली आणि सनरायझर्स यांच्यातील विजेत्या संघाची फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईशी लढत होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची असून यात पराभव झाल्यास स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे.

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 07:48 PM IST

ताज्या बातम्या