दिल्लीचा शानदार विजय, हैदराबादला 2 गडी राखून नमवले

दिल्लीचा शानदार विजय, हैदराबादला 2 गडी राखून नमवले

फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईसोबत होणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 08 मे : हैदराबादने दिलेलं 163 धावांचं आव्हान दिल्लीने अखेरच्या चेंडूवर 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सलामीवीर पृथ्वी शॉच्या अर्धशतकानंतर रिषभ पंतने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने हैदराबादला पराभूत केलं. या विजयासह दिल्लीने फायनलच्या दिशेने वाटचाल केली आहे. शुक्रवारी त्यांचा सामना चेन्नईशी होणार आहे. 163 धावांचा पाठलाग करताना धवन आणि पृथ्वी शॉ यांनी 66 धावांची भागिदारी केली. धवनला बाद करून दीपक हूडाने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकांत सहज विजय मिळेल असे वाटत असताना पंत बाद झाला. शेवटच्या षटकात किमो पॉलने चौकार मारून विजय मिळवला.

आयपीएलच्या 12 व्या हंगामातील प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बाद फेरीचा सामना चेपॉकवर होत आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादने दिल्लीला 163 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीविरुद्ध हैदराबादचे सलामीवीर वृद्धीमान साहा आणि मार्टिन गुप्टिल प्रथम फलंदाजीला मैदानात उतरले. पहिल्याच चेंडूवर साहाला मैदानावरील पंचांनी बाद दिले. यावेळी साहाने मार्टिन गुप्टीलशी चर्चा करून डीआरएसचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी त्याला नॉट आऊट दिलं. याचा फायदा साहाला उठवता आला नाही. तो 8 धावांवर बाद झाला.

सलामीवीर मार्टिन गुप्टिलने 19 चेंडूत 36 धावांची खेळी केली. त्यांनंतर पांडेने 30 धावा केल्या. त्यानंतर केन विल्यम्सन (28), विजय शंकर (25)आणि मोहम्मद नबी (20) यांच्या खेळीमुळे हैदराबादने 20 षटकांत 162 धावा केल्या. किमो पॉलच्या 20 व्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूवर हैदराबादने तीन विकेट गमावल्या.

गुणतक्त्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली आणि सनरायझर्स यांच्यातील विजेत्या संघाची फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईशी लढत होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची असून यात पराभव झाल्यास स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे.

वाचा- IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत एकूण 14 सामने झाले आहेत. यात दिल्लीने 5 तर हैदराबादने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. हैदराबादचा संघ वरचढ दिसत असला तरी त्यांच्या संघात वॉर्नर आणि बेअरस्टोची कमी जाणवणार आहे.


वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 07:04 PM IST

ताज्या बातम्या