DCvCSK : प्लेऑफमध्ये पोहचूनही धोनीला हवाय विजय

DCvCSK : प्लेऑफमध्ये पोहचूनही धोनीला हवाय विजय

दिल्ली आणि चेन्नई यांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं असलं तरीही आजचा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 01 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या दोन संघात बुधवारी लढत होत आहे. चेन्नई आणि दिल्ली यांच्यात विजय मिळवणाऱा संघ पहिल्या स्थानावार पोहचेल. गुणतक्त्यात पहिल्या दोन्ही संघांमध्ये प्लेऑफची पहिली लढत होईल. यात विजेता संघ थेट फायनलला पोहचेल तर पराभूत संघाला फायनमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी एक सामना खेळावा लागेल.

प्लेऑफमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघामध्ये इलिमिनेटर सामना होईल. यातील विजेत्या संघासोबत पहिल्या प्लेऑफमधील पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्यात खेळून फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे.

दिल्ली आणि चेन्नई यांच्यात जो संघ जिंकेल तो 18 गुणांसह अव्वल स्थानी पोहचेल. दोन्ही संघांचा आणखी एक सामना बाकी आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर असेल्या मुंबईचे दोन सामने बाकी असून त्यांनाही उर्वरित सामने जिंकून गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर पोहचण्याची संधी असेल. असे झाल्यास दिल्ली किंवा चेन्नई यांच्यातील पराभूत संघ इलिमिनेटर सामना खेळावा लागेल. त्यात विजय मिळवून पुन्हा क्वालिफायर सामन्यात खेळावं लागेल.

चौथ्या स्थानावर असलेल्या हैदराबादचे 12 गुण झाले असून पुढचे दोन्ही सामने जिंकल्यास ते 16 गुण मिळवून तिसऱे स्थान मिळवू शकतात. जर आजच्या सामन्यात पराभूत झालेला संघ राहिलेल्या एका सामन्यातही हरला तर हैदराबाद किंवा मुंबई यांना दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे बुधवारी होत असलेल्या या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ धडपड करतील.

पॉइंट टेबल


सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज


SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्टबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: May 1, 2019 04:59 PM IST

ताज्या बातम्या